१३ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेत तज्ञांनी केली यूटीआयवरील प्रभावी उपचार पर्यायांवर चर्चा पुणे: पुण्यात आयोजित १३ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेतमध्ये, देशातील आघाडीच्या तज्ञांनी भारतातील यूटीआय आणि एएमआरच्या वाढत्या प्रमाणावर चर्चा करत प्रभावी उपचार पर्यायांची आवश्यकता अधोरेखित केली. जेव्हा बॅक्टेरिया आणि फंगसचा औषधांनी नायनाट करणं कठीण होतं तेव्हा अँटिमायक्रोबिअल रेझिस्टन्सची स्थिती उद्भवते. याठिकाणी नागरिकांनी अँटीबायोटिक्सच्या अतिरेकी वापरावर मर्यादा आणण्याचा सल्ला देण्यात आला. या परिषदेची माहि…
पुणे : जगभरात १३ देशांमध्ये ४०० हून अधिक विक्री दालनांसह जागतिक स्तरावरील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठे दागिने विक्रेते असलेल्या, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने तेलंगणातील हैदराबाद येथे त्यांची अत्याधुनिक, पूर्णपणे एकात्मिक अशी या प्रकारातील सर्वात मोठी दागिने उत्पादन सुविधा सुरू केली आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील महेश्वरम येथील जनरल पार्क येथे स्थित आणि ३.४५ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले हे अशा प्रकारचे पहिले एकात्मिक उत्पादन केंद्र आहे, जे भारत आणि आखाती देशांमध्ये समूहाच्या कार्यरत असलेल्या १४ उत्पादन सुविधांमध्ये सर्वात मोठे देखील आहे. या…
आळंदी (पुणे) : वारकरी संप्रदायातील महान संत ज्ञानेश्वर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आळंदीच्या भूमीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराला भारतासह जगभरातून हजारो साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची, पुणे आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या दोन दिवसांमध्ये १५ ते २० हजार साधकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आध्यात्मिक अनुभूती घेतली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंग…
श्री क्षेत्र आळंदी येथे निःशुल्क ध्यानयोग शिबिरामध्ये सद्गुरूंच्या सानिध्यात आत्मानंद प्राप्त करण्याचा सुवर्ण योग! पुणे (आळंदी) : हिमालयीन समर्पण ध्यान महाशिबिराचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत मुंबई मराठा फ्रुटवाला धर्मशाळा ग्राउंड, आळंदी देवाची, पुणे येथे होत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये वाढलेला तणाव, दुःख आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी बाह्य उपायांचा शोध यातच मनुष्य अडकला आहे. परंतु, दुःख…
'उजास' आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम पुणे : 'उजास' आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व स्वयंसेवकांच्या सहकार्याने १६ ते २५ वयोगटातील सुमारे एक हजार तरूणींना मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या वॉल पेंटिंग उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. मासिक पाळीशी संबंधित मिथक आणि गैरसमजांना आव्हान देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'उजास' हा आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या अद्वैतेश बिर्ला यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणारा उपक्रम आहे. पुण्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण आणि…
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बुलढाणा : सर्व प्रकारच्या माजी लोकप्रतिनिधींनी आपल्या नावासमोर योग्य त्या पदनामाचा उल्लेख करावा, जेणेकरून जनतेत कोणताही संभ्रम होणार नाही, तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींचा योग्य तो मान राखला जाईल, अशी मागणी आपल्या आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या जितेंद्र जैन यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक पत्र पाठवून केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी लोकप्रतिनिधी हे स्वतःच्या नावासमोर मा. किंवा माननीय असा…
घेऊन येणार मराठी चित्रपटांच्या, नाटकांच्या पडद्या मागच्या कहाण्या आणि किस्से पुणे : भारतातील आघाडीच्या रेडिओ नेटवर्कपैकी एक असलेले बिग एफएम मराठी चित्रपट उद्योगाचा वारसा साजरा करत आपला बहुप्रतिक्षित शो बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे घेऊन येत आहे. मराठी चित्रपटातील मनोरंजक किस्से आणि नॉस्टॅल्जिक प्रवासासाठी ओळख असलेल्या या शोच्या तिसरा सीझनची औपचारिक घोषणा करण्यात आली. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. नाविन्यपूर्ण थीम आणि आकर्षक आशयाने भरलेला हा नवा सीझन मराठी सिनेमाच्या अनोख्या आण…
Social Plugin