मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या हैदराबादमधील एकात्मिक उत्पादन सुविधेचे उद्घाटन


पुणे : जगभरात १३ देशांमध्ये ४०० हून अधिक विक्री दालनांसह जागतिक स्तरावरील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठे दागिने विक्रेते असलेल्या, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने तेलंगणातील हैदराबाद येथे त्यांची अत्याधुनिक, पूर्णपणे एकात्मिक अशी या प्रकारातील सर्वात मोठी दागिने उत्पादन सुविधा सुरू केली आहे.

रंगा रेड्डी जिल्ह्यातील महेश्वरम येथील जनरल पार्क येथे स्थित आणि ३.४५ लाख चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले हे अशा प्रकारचे पहिले एकात्मिक उत्पादन केंद्र आहे, जे भारत आणि आखाती देशांमध्ये समूहाच्या कार्यरत असलेल्या १४ उत्पादन सुविधांमध्ये सर्वात मोठे देखील आहे.

या एकात्मिक उत्पादन सुविधेमुळे आभूषण रचना, सोने शुद्धीकरण, दागिने निर्मिती, गुणवत्ता हमी, हॉलमार्किंग, वेअरहाऊसिंग आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन यासारखी सर्व महत्त्वाची कार्य एकाच छताखाली आणली गेली आहेत. या केंद्राची वार्षिक उत्पादन क्षमता ४.७ टनांहून अधिक सोन्याचे दागिने आणि १.८ लाख कॅरेट हिऱ्यांचे दागिने निर्मितीची आहे, तसेच वार्षिक सोन्याची शुद्धीकरण क्षमता ७८ टन आहे.

१८ राज्यांमधून २,७५० हून अधिक कुशल कारागिरांना रोजगार संधी या केंद्राने दिल्या असून, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, कल्याण आणि सोयही सुनिश्चित केली आहे. या सुविधेमधील ४० टक्के कर्मचारी हे स्थानिक परिसरांतून भरती केले गेले आहेत आणि एकूण पुरुष-महिला गुणोत्तर ८० मागे २० असे राखले गेले आहे.

तेलंगणाचे माननीय मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी यांनी या नवीन जनरल पार्क सुविधेचे अधिकृत उद्घाटन मलाबार समूहाचे अध्यक्ष श्री एम.पी. अहमद; उपाध्यक्ष श्री अब्दुल सलाम के.पी; मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या भारतातील कारभाराचे व्यवस्थापकीय संचालक श्री आशर ओ; कार्यकारी संचालक श्री निषाद ए.के. यांच्या उपस्थितीत मलाबार समूहाचे इतर वरिष्ठ व्यवस्थापकीय संघातील सदस्य, तेलंगणा सरकारमधील मान्यवर आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत केले.

वाढीव उत्पादन क्षमतांमुळे 'मेक इन इंडिया, मार्केट टू द वर्ल्ड' या दृष्टिकोनानुसार भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत समूहाच्या आक्रमक किरकोळ विक्री विस्तारालाही यातून चालना मिळेल.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता अनुक्रमे ४०.६८ टन आणि ३.६१ लाख कॅरेटपेक्षा जास्त आहे. ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठ्या दागिन्यांच्या निर्मात्यांपैकी एक बनली आहे.

या सुविधेच्या शुभारंभाबद्दल भाष्य करताना, मलाबार समूहाचे अध्यक्ष श्री. एम. पी. अहमद म्हणाले, "परंपरा, कला, आधुनिकता आणि अचूकता यांचे मिश्रण असलेले हैदराबादमधील आमचे अत्याधुनिक एकात्मिक दागिने उत्पादन केंद्र हे दागिन्यांच्या उत्पादनात एक नवीन युग सुरू करत आहे. आमच्या 'मेक इन इंडिया, मार्केट टू द वर्ल्ड' या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने, ही सुविधा जागतिक बाजारपेठेसाठी भारतात जागतिक दर्जाचे दागिने तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते.

भारताला उत्कृष्ट कारागिरी आणि डिझाइन उत्कृष्टतेसाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या दिशेने ही सुविधा एक धोरणात्मक झेप दर्शवते. प्रेमाचे शुद्ध प्रतीक म्हणून सोने, प्रेम आणि स्नेहाची अभिव्यक्ती म्हणून वारसा हा कालातीत राहील. मलाबार गोल्ड अँड डायमंड्समध्ये, आम्ही आमच्या विश्वासार्ह आजीवन देखभालाची हमी आणि पारदर्शक बायबॅक गॅरंटीच्या  'मलबार प्रॉमिसेस'द्वारे समर्थित, केवळ सर्वोत्तम सोने आणि हिऱ्याचे दागिने देऊन या वारशाचा सन्मान करतो - प्रत्येक खरेदीमध्ये आम्ही आणत असलेल्या शाश्वत मूल्य आणि अखंडता हा त्याचाच पुरावा आहे."

Post a Comment

0 Comments