सुमित खरे यांच्या फेसबूक पोस्टने नाराजीची जोरदार चर्चा पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात गेल्या पोटनिवडणुकीत पराभूत होऊन संपूर्ण महाराष्ट्रात रवींद्र धंगेकर यांना 'फेमस' करण्यासाठी कारणीभूत झालेले भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनाच पुन्हा पक्षाकडून का संधी देण्यात आली, हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जाणो, परंतु त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये उफाळून आलेल्या सुप्त नाराजीचं करणार काय? ही नाराजी भाजप पक्षश्रेष्ठी नेमकी कशी शमवणार, आज हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात सुमारे दीड वर्षांपूर्वी ऐतिहासिक पोटनिवडणूक झाली होत…
मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याचे मोकाटेंचे आश्वासन पुणे - महाविकास आघाडीचे कोथरुडचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा सध्या संपूर्ण मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून, ठिकठिकाणी नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहेत. चंद्रकांत मोकाटे नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. मोकाटे यांचा बाणेर-बालेवाडी, पाषाण परिसरात प्रचार सुरू असताना नागरिकांनी मेट्रोच्या कामामुळे निर्माण होत असलेली वाहतुकीच्या कोंडीची समस्या मांडली. आज या समस्येमुळे आम्ही प्रचंड त्रस्त असल्याचेही या वेळी नागरिकांनी सांगि…
प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवादावर मोकाटेंचा भर पुणे : शहराचे पर्यावरण चांगले राहावे मुळा मुठा नदी स्वच्छ राहावी. प्रदूषणमुक्त पुणे व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी रविवारी सांगितले. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे कोथरुड मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा सध्या झंझावाती प्रचार सुरू असून, या प्रचारात ते थेट जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. सध्या पुण्यात पर्यावरणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. अशात वेताळ टेकडी बचाव कृती समिती व पुणे रिव्…
कोथरूड गावठाण, भुजबळ वस्ती, भूमकर आळीमध्ये पदयात्रा कोथरुड, पुणे - महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी त्यांच्या आमदारकी व नगरसेवकपदाच्या काळात चांगली विकासकामे कोथरूड विधानसभा मतदारंसंघाचा विकास केली. मात्र, त्यानंतरच्या 10 वर्षाच्या काळात विकासकामांचा वेग मंदावला. असे मत पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख गजानन थरकुडे यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी शनिवारी कोथरूड गावठाण, भुजबळ वस्ती, भूमकर आळी, खालची व वरची आळी कांबळे वस्ती एकता कॉलनी, आदी परिसरात पदयात्रा काढून नागरिक…
बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात दुचाकीवाहनस्वारांच्या रॅलीचे जोरदार स्वागत पुणे : बाणेर, बालेवाडी पाषाण परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारासाठी दुचाकीस्वारांची भव्य रॅली गुरुवारी सकाळी 10-30 ते दुपारी 2-30 दरम्यान आयोजित करण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे दुपारी 2-30 वाजता बाणेर येथील हॉटेल महाबळेश्वर पासून सहभागी झाल्या. बाणेर, विधाते वस्तीपासून त्या डी पी रस्त्यावरील आंबेडकर वसाहतीमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅलीत सहभागी झाल्या. डॉ आंबेडकर यांच…
मविआचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्यासमोर कुमार बराटे यांनी मांडली कैफियत पुणे : महाविकास आघाडीचे कोथरुडचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा कर्वेनगरात पदयात्रेद्वारे जोरदार प्रचार सुरू असून, कर्वेनगरचा संपूर्ण परिसर त्यांनी पिंजून काढला आहे. प्रचारा दरम्यान नागरिक विविध समस्या त्यांच्यासमोर मांडत आहेत. कर्वेनगर गावठान आणि अन्य परिसरात मुलांना खेळण्यासाठी मैदानाची उपलब्धता नाही. त्यामुळे भविष्यातील खेळाडू कसे निर्माण होतील, असा प्रश्न कुमार बराटे यांनी मोकाटे यांच्यासमोर उपस्थित केला. बराटे पुढे म्हणाले की, पूर्वी पुणे महापालिकेच्या सम…
चंद्रकांत मोकाटे यांचा जनतेशी थेट संवाद पुणे : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे हे आपल्या प्रचारादरम्यान मतदारांशी थेट संवाद साधत आहे. कर्वेनगर परिसरात प्रचारादरम्यान चंद्रकांत मोकाटे यांच्यासमोर नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. सामान्य नागरिक म्हणाले की, या परिसरात वाहतुकीची समस्या व कोंडी मोठया प्रमाणावर होत आहे. खरेतर कर्वेनगर ते वारजे उड्डाणंपुलचौक दरम्यान माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी उड्डाणंपूलाची एक चांगली योजना मंजूर करून घेतली होती. पण ही योजना बदलून त्याऐवजी कर्वेनगरमध्ये फक्त उड्डाणंपुल केला या उड्डाणंपूलामुळे …
Social Plugin