मविआचे कोथरुडचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे मैदानात

बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात दुचाकीवाहनस्वारांच्या रॅलीचे जोरदार स्वागत 


पुणे : बाणेर, बालेवाडी पाषाण परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारासाठी दुचाकीस्वारांची भव्य रॅली गुरुवारी सकाळी 10-30 ते दुपारी 2-30 दरम्यान आयोजित करण्यात आली.

या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे दुपारी 2-30 वाजता बाणेर येथील हॉटेल महाबळेश्वर पासून सहभागी झाल्या. बाणेर, विधाते वस्तीपासून त्या डी पी रस्त्यावरील आंबेडकर वसाहतीमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅलीत सहभागी झाल्या. डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यासं पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली 

पाषाण येथील सोमेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन श्री मोकाटे यांच्या रॅलीसं सुरुवात झाली सोमेश्वर वाडी पाषाण पाषाण गावठाण बाणेर पाषाण लिंक रोड सुतारवाडी, बाणेर बालेवाडी विधाते वस्ती बालेवाडी गावठाण मार्गे आंबेडकर वसाहत या मार्गाने दुचाकीस्वारांची रॅली काढण्यात आली 

या रॅलीत त्यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे माजी नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू कदम, तानाजी निम्हणं अजय निम्हणं गणपत मुरकुटे, ज्योती चांदेरे, गजानन थरकुडे, दिलीप मुरकुटे, सुनिता रानवडे आदी या रॅलीत सहभागी झाले.


Post a Comment

0 Comments