मविआचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा पदयात्रांचा धडाका सुरूच

कोथरूड गावठाण, भुजबळ वस्ती, भूमकर आळीमध्ये पदयात्रा



कोथरुड, पुणे - महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी त्यांच्या आमदारकी व नगरसेवकपदाच्या काळात चांगली विकासकामे कोथरूड विधानसभा मतदारंसंघाचा विकास केली. मात्र, त्यानंतरच्या 10 वर्षाच्या काळात विकासकामांचा वेग मंदावला. असे मत पुणे शहर शिवसेनेचे प्रमुख गजानन थरकुडे यांनी व्यक्त केले. 

महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी शनिवारी कोथरूड गावठाण, भुजबळ वस्ती, भूमकर आळी, खालची व वरची आळी कांबळे वस्ती एकता कॉलनी, आदी परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संपर्क साधला. या परिसरातील नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले 

थरकुडे पुढे म्हणाले की, मोकाटे यांनी सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर विकासकामे केली आहेत. ते या भागातील रहिवासी आहेत, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना जाणवणाऱ्या समस्यांची माजी आमदार मोकाटे यांना जाणीव आहे. मोकाटे हे कर्वेनगर, वारजे, कोथरूड परिसरात होणारी वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी कॅनलवर रस्ते बांधले, चांदणी चौकात होणाऱ्या अपघातांविषयी आंदोलने केली आणि आवाज उठवला. महाविकास आघाडीचे उमेदवार मोकाटे हेच पुन्हा आमदार व्हावेत म्हणून सर्व जण जोमाने काम करीत आहेत. त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

शनिवारी झालेल्या पदयात्रेत शिवाजी गाढवे, माजी नगरसेविका वैशाली मराठे, चंदू कदम, राजू मराठे, संजय मोकाटे, दत्तोबा वांबीरे, बाळासाहेब खैरे राजेश पासलकर, राजू मगर यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील पक्षांचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते


Post a Comment

0 Comments