चंद्रकांत मोकाटे यांचा जनतेशी थेट संवाद
पुणे : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे हे आपल्या प्रचारादरम्यान मतदारांशी थेट संवाद साधत आहे. कर्वेनगर परिसरात प्रचारादरम्यान चंद्रकांत मोकाटे यांच्यासमोर नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला.
सामान्य नागरिक म्हणाले की, या परिसरात वाहतुकीची समस्या व कोंडी मोठया प्रमाणावर होत आहे. खरेतर कर्वेनगर ते वारजे उड्डाणंपुलचौक दरम्यान माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी उड्डाणंपूलाची एक चांगली योजना मंजूर करून घेतली होती. पण ही योजना बदलून त्याऐवजी कर्वेनगरमध्ये फक्त उड्डाणंपुल केला या उड्डाणंपूलामुळे वाहतुकीची समस्या कमी होण्याऐवजी वाढलीच आहे, अशा प्रतिक्रिया या परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधीनी व्यक्त केल्या.
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी बुधवारी कर्वेनगर व दुधाने वस्तीमध्ये पदयात्रेद्वारे नागरिकांशी संपर्क साधून संवाद साधला ठिकठिकाणी त्यांच्या पदयात्रेस नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, नगरसेवक स्वप्नील दुधाने, माजी स्वीकृत नगरसेवक नंदू घाटे, दशहरी चव्हाण, पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय खळदकर, संतोष वाघमारे, जगदीश दिघे, रविराज इंगुळकर, अजय भुवड, किरण बराटे, वैशाली दिघे, पल्लवी नागपुरे डॉ अभिजित मोरे गोविंद थरकुडे आदी सहभागी झाले होते. श्री मोकाटे यांची आज इंगळे नगर, दत्त दिगंबर कॉलनी, जावळेकर वस्ती आदी भागात पदयात्रा झाली.
माजी नगरसेवक स्वप्नील दुधाने म्हणाले की, कर्वेनगर ते वारजे उड्डाणंपुल चौक दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी उड्डाणंपूलाची योजना आखली होती. ती मंजूरही केली. पण त्यांच्या नंतर आलेल्या लोकप्रतिनिधीनी त्यामध्ये बदल केला आणि फक्त कर्वेनगर पुरताच उड्डाणंपुल केला गेला त्यामुळे वाहतुकीची कोंडी व समस्या दूर होण्याऐवजी ती वाढल्याचे चित्र आहे.
या परिसरात 50 हजाराहून अधिक नागरिक राहतात त्यांचा विचार कोण करणार माजी स्वीकृत नगरसेवक नंदू दिघे म्हणाले की, कर्वेनगर ते वारजे उड्डाणंपुल अर्धवट केल्याने या परिसरात वाहतुकीची समस्या वाढली आहे.
पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय खळदकर यांनी सांगितलं की, कर्वे नगर परिसरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे ती सोडविण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही.
गोविंद थरकुडे म्हणाले की, या परिसरातील वाहतुकीची कोंडी कोणतेही प्रयत्न होतं नाहीत, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
0 Comments