सोमैय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरूवात




पुणे : सोमैय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, मुंबई या भारतातील शैक्षणिक विकास आणि सर्वांगीण वाढीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्यातनाम संस्थेने महाराष्ट्र एचएससी बोर्ड २०२४ निकालांच्या घोषणेनंतर पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

एसव्हीयू मुंबईच्या विविध महाविद्यालयांमधून अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाणिज्य, विज्ञान, डिझाइन, शिक्षण, विज्ञान, क्रीडा आणि संगीत अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये ३१ पदवी अभ्यासक्रम चालवले जातात. इच्छुक विद्यार्थी अधिकृत नोंदणी लिंक (official registration link या अधिकृत नोंदणी लिंकद्वारे या अभ्यासक्रमांसाठी अर्ज दाखल करू शकतात. 

बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याबद्दल बोलताना सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी, मुंबईचे कुलगुरू तसेच यूजीसीचे माजी अध्यक्ष प्रा. (डॉ.) व्ही. एन. राजशेखरन पिल्लई म्हणाले की, “महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणी सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

एसव्हीयूमध्ये आम्ही एक सर्वांगीण शैक्षणिक अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत. एक ताजा दृष्टीकोन आणि विचार आणणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हे विद्यार्थी या प्रवासात आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या शिक्षणात योगदान देऊ आणि भविष्यातील नेतृत्व म्हणून त्यांच्या वाढीला चालना देऊ. एक उज्ज्वल भवितव्य एकत्र निर्माण करण्यासाठी आपण या संधीचा फायदा घेऊया.”

करियरची उंच शिखरेः प्लेसमेंट आणि शिष्यवृत्ती

एसव्हीयू मुंबईमध्ये विविध प्रकारची प्रतिष्ठित महाविद्यालये आहेत. त्यातील एस. के. सोमैया कॉलेज प्रतिष्ठीत आहे आणि के. जे. सोमैया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आपल्या प्रभावी प्लेसमेंट रेकॉर्डसाठी ओळखले जाते. इथल्या विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट, गुगल इत्यादींसारख्या कंपन्यांकडून वार्षिक रु.५८ लाखांपर्यंत पॅकेजेस देण्यात आली आहेत. युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थ्यांनी डन्झो आणि फार्मइझी अशा प्रतिष्ठित स्टार्टअप कंपन्या सुरू केल्या आहेत.

 एसव्हीयूकडून न्यू एज्युकेशन पॉलिसी (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने तीन ते चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. बहुशाखीय इलेक्टिव्ह आणि मायनर्ससोबत विद्यार्थ्यांना ऑनर्स पदवी घेता येते. ही युनिव्हर्सिटी १० टक्के स्कॉलरशिप सीट्स देते आणि तिने ५० पेक्षा जास्त ख्यातनाम आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटीजसोबत भागीदारी केली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त शिक्षण शुल्क न भरता सेमिस्टर अॅब्रॉड ऑप्शनदेखील वापरता येईल.  

एसव्हीयू आपल्या शैक्षणिक सर्वोत्तमता, नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि सर्वांगीण विकासासाठी ओळखली जाते. विविध क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे अभ्यासक्रम देणारी ही युनिव्हर्सिटी एक डायनॅमिक अध्ययन वातावरण देते ज्यातून बौद्धिक आणि वैयक्तिक वाढीला प्रोत्साहन देते. अनुभवी शिक्षकवर्ग, उत्तम दर्जाच्या सुविधा आणि मुंबईतील सर्वांत मोठ्या कॅम्पससह एसव्हीयू विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून समाजात सकारात्मक योगदान देण्यासाठी सुसज्ज करते.  


Post a Comment

0 Comments