ग्लेनमार्क कडून ४०० पेक्षा अधिक हायपरटेंशन जनजागृती रॅलींचे आयोजन


पुणे : संशोधनकेंद्रित जागतिक औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (ग्लेनमार्क) मे महिना हा ‘हायपरटेंशन जनजागृती महिना‘ म्हणून साजरा केला. ग्लेनमार्कने उच्च रक्तदाबाबत (हायपरटेंशन) जनजागृती पसरविण्यासाठी देशभरातील २५० पेक्षा अधिक शहरे आणि ४०० पेक्षा अधिक रुग्णालयांतील १०००  पेक्षा अधिक वैद्यकीय व्यावसायिकांशी भागीदारी केली. तसेच ४०० पेक्षा अधिक हायपरटेंशन जनजागृती रॅली व तपासणी शिबिरांचे आयोजन केले.

वैद्यकीय व्यावसायिक भागीदारांच्या नेतृत्वाखालील सामान्य माहिती देणारे सत्र असे या रॅलींचे स्वरूप होते. त्यांनी उच्च रक्तदाबाशी संबंधित चिन्हे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यांबाबत सखोल माहिती दिली. याच अनुषंगाने सामान्य लोकांना आपल्या रक्तदाबाची पातळी जाणून घेण्यास मदत करण्यासाठी रक्तदाब तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्लेनमार्कने ६० लाखांपेक्षा अधिक प्रौढ व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश मिळविले. परिणामी या आजाराबाबत जागृती वाढविण्यास मदत झाली.

या कार्यक्रमाबाबत बोलताना ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष व इंडिया फॉर्म्यूलेशन्सचे प्रमुख आलोक मलिक म्हणाले, “भारतात हायपरटेंशनच्या विरोधातील लढ्यात जनजागृती निर्माण करून एक परिणामकारक बदल घडविण्यासाठी आम्ही ठामपणे कटिबद्ध आहोत. भारतीय लोकांमध्ये, ज्यात १८ वर्षांवरील तरुणांचाही समावेश आहे, याचा प्रसार वाढत असल्यामुळे या गुप्त मारेकऱ्याबाबत (सायलेंट किलर) जनजागृती पसरविण्याला प्राधान्य देणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

लोकांनी उच्च रक्तदाबाचे त्वरित निदान करून आपल्या आरोग्यावर नियंत्रण मिळवावे, हे आमच्या उपक्रमांचे लक्ष्य आहे कारण रक्तदाब वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. या आजाराने ग्रस्त असलेल्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण एकत्र येऊन लक्षणीय प्रभाव आणू शकतो."

भारतीय लोकांमध्ये उच्च रक्तदाबाबत जागरुकता वाढविण्यात आणि लवकर निदान करण्यास प्रोत्साहन देण्यात ग्लेनमार्क आघाडीवर आहे. कंपनीने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भारतीय प्रौढांसाठी उच्च रक्तदाबाबत जागरूकता आणि तपासणीला चालना देण्यासाठी #टेक चार्जे ऍक्ट (TakeChargeAt) १८ ही मोहीमही सुरू केली होती. ग्लेनमार्कने www.bpincontrol.in या आपल्या डिजिटल वाहिनीसह विविध माध्यमांतून लाखो भारतीय प्रौढ व्यक्तींशी अगोदरच संपर्क साधलेला आहे.

ग्लेनमार्कने २०२० मध्ये एचएसआय (हायपरटेंशन सोसायटी ऑफ इंडिया) आणि एपीआय (असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील पहिले हायपरटेन्शन जागरूकता चिन्ह – “द बीपी लोगो” सादर केले होते.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांबाबत (सीव्हीडी) जोखमीचे कारण असलेल्या उच्च रक्तदाबाने भारतातील अंदाजे ३५.५ टक्के प्रौढ व्यक्ती ग्रस्त आहेत. चिंताजनक बाब म्हणजे सीव्हीडी हे देशातील मृत्यूचे प्रमुख कारण असून मृत्यूच्या एकूण घटनांपैकी जवळजवळ एक चतुर्थांश प्रकरणांसाठी ते जबाबदार आहे. या समस्येचा प्रभावीपणे सामना करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने २०२५ पर्यंत १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींमधील उच्च रक्तदाबाचा (बीपी) प्रादुर्भाव २५ टक्के सापेक्ष कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उच्च रक्तदाबाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, कारण या आजाराचे सक्रियपणे नियंत्रण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी ते एक महत्त्वपूर्ण सुविधा म्हणून काम करते. याशिवाय अधिक जागरूकता निर्माण झाल्यास प्रभावी व्यवस्थापन धोरणांचा अवलंब करण्याचे महत्त्व सर्वांना समजून येईल.

Post a Comment

0 Comments