छत्तीसगड हँडलूम प्रदर्शनास पुण्यात जोरदार प्रतिसाद



पुणे : छत्तीसगड राज्यातील अत्यंत सुप्रसिद्ध अशा सिल्क साडी, सलवार सूट व ड्रेस मटेरियलच्या अनोख्या प्रदर्शनाल दि. ७ जूनपासून थाटात सुरवात झाली असून, पुणेकर नागरिकांचा पहिल्या दिवसापासूनच या प्रदर्शनास प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. टिळक स्मारक मंदिरात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दि. १३ जून पर्यंत चालणाऱे हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

या प्रदर्शनात कोना सिल्क, टसर सिल्क साडी सह विविध प्रकारचे सलवार व ड्रेस मटेरियल, यासह कोसा जॅकेट, दुपट्टा कस्तो, काॅटन कपडे, बेडशीट, शर्टिंग, टाॅवेल अशा हँडलूमच्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

ग्रामीण कुटिर उद्योगाला चालना देणे, महिलांद्वारे तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या डिझाईनच्या कपड्यांचा प्रचार प्रसार करणे, तसेच हँडलूमच्या कपड्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने छत्तीसगड सरकारच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनात विविध ५ हजारापासून ते २५ हजार रुपयांपर्यंतच्या अत्यंत दर्जेदार साड्या पुणेकर महिलांसाठी उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनात विकल्या जाणाऱ्या कपड्यांवर २० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त पुणेकरांनी घ्यावा, असे आवाहन छत्तीसगड सरकारच्या हँडलूम विभागाचे उपसंचालक एम. एम. जोशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments