पिंपरी चिंचवड मनपाला आयजीबीसी एक्झिस्टिंग ग्रीन सिटीजसाठीचे प्लॅटिनम रेटिंग

हरित विकासासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा होणार सन्मान


पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. हरित शाश्वत विकासामध्ये महत्वपूर्ण कामगिरीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आयजीबीसी एक्झिस्टिंग ग्रीन सिटीजसाठीचे प्लॅटिनम रेटिंग जाहीर झाले असल्याची माहिती आयजीबीसीच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा डॉ पूर्वा केसकर यांनी कळविली आहे.

राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या इंडियन ग्रीन बिल्डींग काऊंसिल (आयजीबीसी) आणि कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सदर रेटिंग प्रदान करण्यात येत असते.

आयजीबीसीच्या पुणे विभागाच्या वतीने येत्या शुक्रवार दि ७ जून रोजी सायं ५ वाजता नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेस जवळील हॉटेल हयात या ठिकाणी होणाऱ्या ‘अभिनंदन’ या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला सन्मानित करण्यात येईल.

राज्याच्या नगर विकास मंत्रालयाचे मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना आयजीबीसी एक्झिस्टिंग ग्रीन सिटीजसाठीचे प्लॅटिनम रेटिंग प्रमाणपत्र प्रदान करीत सन्मानित करण्यात येईल. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील अशी माहिती देखील आयजीबीसीच्या पुणे विभागाचे सह अध्यक्ष ऋषिकेश मांजरेकर यांनी दिली.

शाश्वत विकासाची कास धरीत कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, संस्थांना दरवर्षी आयजीबीसीच्या वतीने सन्मानित करण्यात येत असते यावर्षी हरित शाश्वत विकासामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केल्याच्या सन्मानार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आयजीबीसी एक्झिस्टिंग ग्रीन सिटीजसाठीचे प्लॅटिनम रेटिंग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबतच पुणे परिसरातील आयजीबीसी मानांकन प्राप्त हरित प्रकल्पांना देखील यावेळी सन्मानित करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments