महावितरणच्या उत्कृष्ट ५६ जनमित्रांचा सहकुटुंबासह गौरव

वीजग्राहकांचे तत्पर समाधान हीच सेवेची खरी पावती – मुख्य अभियंता राजेंद्र पवार


पुणे : ‘सुरळीत वीजपुरवठा व विविध ग्राहक सेवेचे कर्तव्य चोखपणे बजावताना वीजग्राहकांचे तत्पर समाधान करणे हीच खरी महावितरणच्या सेवेची पावती आहे. वीजक्षेत्रात काल केलेल्या कामगिरीवर आज तगू शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे तत्पर ग्राहक सेवा देण्यासाठी कायम सजग व सज्ज राहावे’ असे आवाहन असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. १) केले.

महावितरणच्या पुणे परिमंडलातील सन २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या उत्कृष्ट १२ यंत्रचालक व ४४ तांत्रिक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सहकुटुंब गौरविण्यात आले.

रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री युवराज जरग, संजीव राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्थापत्य विभागातील तीन उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  

पुणे परिमंडलातील विभागनिहाय उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे– रोहिदास मेमाने, प्रवीण जगताप, श्रीनिवास दुधभाते, नागेश बाबर (बंडगार्डन विभाग), बाळकृष्ण चव्हाण, दीपक सैंदाणे, गोरखनाथ खोचे, नंदकिशोर गायकवाड (नगररोड विभाग), भगवान अहिरे, रत्नाकर पांचाळ, दिगंबर गजेले, मधु हरी पवार (पदमावती विभाग), सुरेश सोनवणे, दीपक गायकवाड, साधना कोवे, प्रमोद भाकरे, (पर्वती विभाग), विवेक पाटील,

विलास हिरवे, अमोल कोकरे, लक्ष्मण गायकवाड, भाग्यश्री मडावी (रास्तापेठ विभाग), अतुल ढवळे, संभाजी थोरवे, खलील तांबोळी, प्रशांत बनसोड, नीलेश आरुडे, गंगाराम विरणक (मंचर विभाग), गणेश भोईटे, नामदेव मोरे, प्रवीण कापडे, मुस्तफा शेख, किशोर वाळूंजकर (मुळशी विभाग), योगेश पावडे, गणेश कदम, अनिल पाटील, पंकज येवले, काशिनाथ सरोगदे, पंढरीनाथ सवाणे, चंद्रभान ढवळे (राजगुरूनगर विभाग), हणमंत शिंदे, अजित मस्के, विठ्ठल गणगे,

विलास चव्हाण (भोसरी विभाग), भगवान मोरे, दीपक शेंडगे, श्रावण कांबळे, सुग्रीव ढेकणे (कोथरूड विभाग), अजय सोनवणे, वेंकटरायप्पा देवराजू, आवेज मुजावर, सुरेश कुऱ्हाडे (पिंपरी विभाग), निवृत्ती लोहार, सुनील कुमेरिया, सचिन वराडे, रूपाली कांबळे, दीपक रसाळ (शिवाजीनगर विभाग) आणि शैलेंद्र भालेराव, सुजित विभुते, हरिश्चंद्र गुंजाळ (स्थापत्य)

Post a Comment

0 Comments