थॉमस कुकच्या हॉलिडे बिझनेससाठी महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ


* महाराष्ट्र राज्यातून महिना-दर-महिना ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे

* देशांतर्गत सुट्ट्यांमध्ये अंदाजे ४७ टक्के वाढ; छोट्या सुट्ट्यांसाठी ३६ टक्के; लांब पल्ल्याच्या सुट्ट्यांमध्ये

   १८ टक्के सुधारणा

* युरोप आणि उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय सुट्ट्यांना मोठी मागणी

* देशांतर्गत तीर्थयात्रा आणि समुद्रपर्यटनांसाठी ऑनलाइन शोधांमध्ये १०० टक्के पेक्षा जास्त वाढ

पुणे : थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड या भारतातील आघाडीच्या सर्वव्यापी प्रवासी सेवा कंपनीची आकडेवारी, केवळ मुंबई आणि पुणे यासारख्या शहरांमधीलच नव्हे तर प्रादेशिक महाराष्ट्रातील मागणी चालकांसह कंपनीच्या वाढीच्या मार्गाला बळ देणारी एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रा असल्याचे अधोरेखित करीत आहे. लक्षणीय बाब म्हणजे, प्रीमियम टूरची जोरदार मागणी आहे, महाराष्ट्रीयन त्यांच्या प्रवासाचे अंदाजपत्रक २५ टक्के ते ३० टक्क्याने वाढवण्यास आणि त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी १५ दिवसांपेक्षा जास्त वाढवण्यास तयार आहेत.

ठळक वैशिष्ट्ये : 

टॉप सोर्स मार्केट :  मुंबई आणि पुणे व्यतिरिक्त नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड,सोलापूरसह इतर शहरांमधून मागणी वाढत आहे

डेस्टिनेशन्स : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सुट्ट्यांमध्ये अनुक्रमे ४७ टक्के आणि ५३ टक्के वाढ दिसून येत आहे. छोट्या सुट्ट्यांसाठी देशांतर्गत आणि अल्प अंतरासाठी आणि दीर्घ सुट्ट्यांसाठी आंतरराष्ट्रीय थिनांसाठी मागणी वाढत आहे 

देशांतर्गत : लोकप्रिय ठिकाणेः काश्मीर, लेह-लडाख, उत्तराखंड, अंदमान, केरळ, अयोध्या, द्वारका, चारधाम, ज्योतिर्लिंग टूर, वाराणसी आणि प्रयागराज, शिर्डी दर्शन, यांना हेलिकॉप्टरद्वारे पिलग्रीमेज प्लस (तीर्थयात्रा) टूर (१०० टक्के साल-दरसाल) ची मागणी वाढली आहे. वैष्णोदेवी मध्ये माउंटन बाइकिंग आणि पॅराग्लायडिंग, ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग आणि कायाकिंग,

उत्तराखंडमध्ये कॅम्पिंग आणि भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय राखीव क्षेत्रात सफारी गेम ड्राइव्ह यासारख्या बाह्य साहसांसह महाराष्ट्रीयन लोक दर्शने एकत्र करत आहेत. भारतातील वरिष्ठांव्यतिरिक्त, थॉमस कुकमध्ये बहु-पिढी कुटुंबे (३५ टक्के ) जोडपी आणि हनीमुनसाठी जाणारे (२५ टक्के ) तरुण महाराष्ट्रीयन-मिलेनियल्स आणि  जनरल झी (३० टक्के ) वरिष्ठ /  जनरल एस (१० टक्के  यासारख्या विभागांच्या मागणीत वाढ दिसून येत आहे. माननीय पंतप्रधानांच्या भेटीनंतर कंपनीने अयोध्यात १००० टक्के वाढ नोंदवली आहे.

थॉमस कुक (इंडिया) लिमिटेडचे एमआयसीइ , व्हिसा, हॉलिडेजचे अध्यक्ष आणि कंट्री हेड राजीव काळे म्हणाले, आम्ही आमच्या प्रमुख युरोपियन एक्स्ट्रावॅगान्झा सुट्ट्या पुन्हा सुरू केल्या आहेत.आमच्या ग्राहकांना स्थानिक फ्लेवर्सची खरी अनुभूती देण्यासाठी, आमच्या युरोपियन एक्स्ट्रावॅगान्झा टूर "व्हॉट इज मोअर" आश्चर्यचकित करतात. इटलीतील जिलेटो, फ्रान्समधील वाइनचा प्याला, युरोप इन अ बॉक्स स्मरणिका आणि बरेच काही.महाराष्ट्रातून निघणाऱ्या आमच्या सर्व टूरकरिता मराठी भाषिक तज्ज्ञ टूर व्यवस्थापक सोबत आहेत.

महाराष्ट्र ग्राहकांकडून   प्रीमियम  सुट्ट्यांसाठी वाढती मागणी असून उच्च दर्जाची हॉटेल्स, अद्वितीय अनुभव आणि स्थानिक पाककृती प्रदान करणाऱ्या सर्वोत्कृष्ट सुट्ट्यांचा  शोधात आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांनी स्वित्झर्लंडच्या अल्पाइन व्हिस्टा आणि भारत आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांमधील क्रूझमध्ये रेल्वे प्रवासाच्या मागणीत ६०-८० टक्के वाढ दर्शविली आहे. २०१९ च्या तुलनेत खर्चामध्ये २५ टक्के - ३० टक्के वाढ

आंतरराष्ट्रीय : 

लांब आणि मध्यम पल्ल्याचा प्रवासः युरोप (स्वित्झर्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया; फिनलंड, स्वीडन आणि आइसलँडसारखे 

स्कँडिनेव्हियन देश देखील) यूएसए, ऑस्ट्रेलिया, तुर्की, जपान, आफ्रिका

अल्प अंतर: थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम-कंबोडिया, सिंगापूर, दुबई, अबू धाबी, ओमान, 

अझरबैजान, कझाकस्तान

भारतीय उपखंड: भूतान, नेपाळ आणि श्रीलंका

व्हिसा-मुक्तः व्हिसा-मुक्त प्रवेशाच्या घोषणा श्रीलंका, मलेशिया आणि थायलंडसारख्या गंतव्यस्थानांसाठी गेम-चेंजर ठरल्या आहेत. परिणामी सुमारे ३५ टक्क्यांपर्यंतची लक्षणीय वाढ झाली आहे.

Post a Comment

0 Comments