‘क्युअर अँड बियॉन्ड’ ही जाहिरात मोहिम एमएस धोनीसह सादर

एमक्युअर फार्मास्युटिकल्सचा उपक्रम


पुणे : भारतातील आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या एमक्युअर फार्मास्युटिकल्सने क्रिकेटपटू एमएस धोनी सह ‘क्युअर अँड बियॉन्ड’ या टॅगलाइन असलेल्या  आपल्या नवीन कॉर्पोरेट मोहिमेचे अनावरण केले.

आरोग्यसेवेच्या सतत बदलत असलेल्या जगात एमक्युअर फार्मास्युटिकल्स निव्वळ उपचारांच्या पलीकडे जाणाऱ्या ‘क्युअर अँड बियॉन्ड’ वर आपला विश्वास दृढ करण्यासाठी सज्ज आहे. मोहिमेचा उद्देश केवळ एमक्युअरच्या कामकाजाचा आधारस्तंभ म्हणून नावीन्यपूर्णतेबद्दल जागरूकता वाढवण्याचा नाही तर भारतीय औषधनिर्माण बाजारपेठेमध्ये एक नवीन विचारधारा रुजवून त्यात अग्रणी राहण्याचा देखील आहे.

ही जाहिरात मोहीम रुग्णांना औषधनिर्माण उत्पादने सादर करण्याच्या पारंपरिक भूमिकेच्या पलीकडे जाणाऱ्या रोचक कथेवर आधारित आहे. यातून लाखो लोकांना निरोगी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी पाठबळ, सक्षमीकरण आणि शिक्षित करण्याच्या व्यापक उद्देशाचा मागोवा घेण्यात आला आहे. ‘कॅप्टन कूल’ ला दाखवणारी ही जाहिरात फिल्म डिजिटल, टेलिव्हिजन आणि मुद्रित माध्यमांचा समावेश असलेल्या विविध मीडिया प्लॅटफॉर्मवर सादर केली जात आहे.

यावेळी बोलताना एमक्युअर फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेहता म्हणाले, “एमक्युअर मध्ये आम्ही नेहमीच वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करत असतो. ‘क्युअर अँड बियॉन्ड’ ही जाहिरात मोहीम म्हणजे आमचा दृष्टीकोन समोर ठेवण्याचा आणि आम्ही कशासाठी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आपल्या जीवनात सर्व ध्येयांच्या पुढे आणि पलीकडे गेलेल्या धोनी सारख्या व्यक्तीपेक्षा दुसरे कोण हे अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकेल? या प्रयत्नांतून नाविन्यपूर्णतेच्या माध्यमाद्वारे समाजाला सक्षम बनवू शकतो या आमच्या दृढविश्वासाला आम्हाला आणखी मजबूत करायचे आहे.”

एमक्युअर फार्मास्युटिकल्ससाठी, चांगले आरोग्य आणि स्वास्थ्य हे आकांक्षा आणि यशांनी भरलेल्या परिपूर्ण जीवनासाठीची फक्त सुरुवात आहे.

Post a Comment

0 Comments