चेन्नईत झालेल्या स्केटिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

राज्यातील १० आर्टिस्टिक रोलर स्केटर्सने पटकावले कांस्य पदक


पुणे : चेन्नई शहरामध्ये नुकत्याच झालेल्या ६१व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पीयनशीपमध्ये पुण्याच्या आठ आर्टिस्टिक रोलर स्केटर्स (सीनियर) ने दमदार कामगिरी करीत आठ कांस्यपदकांवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत दोन मुंबईच्या खेळाडूंनीही जोरदार कामगिरी करीत रौप्य पदकांची कमाई केली.

या स्पर्धेत वेदिका बापट, व्योमा वकील, सानवी बराटे, इशिता भागवत, चिन्मयी जगताप, वैष्णवी गुंजाळ, राजसी अभ्यंकर आणि कांचन मुसमाडे यांनी कांस्यपदक जिंकले. या खेळाडूंनी महाराष्ट्र राज्यात सुवर्णपदक जिंकले होते. व्योमा आणि सानवीसह आणखी दोन मुंबई स्केटर्सनी क्वार्टेट डान्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक मिळवले.

कॅडेट गटात आठ आर्टिस्टिक रोलर स्केटर्स – (ज्युनियर,)  आदित जगताप, सोहम साने, मैत्रेयी लिमये, वेद शिंगारे, रमा भावे, निहिरा दामले, आभा खोलगडे, अंशिता भिसे यांनी ६१व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत या खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकले होते. 

याशिवाय मैत्रेयी लिमये हिने वैयक्तिक गटात द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व स्केटर्सना मेघना जुवेकर यांनी मार्गदर्शन दिले आहे. या कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments