ग्लेनमार्क ने लाँच केले अँटी-डायबेटिक औषध `लिराफीट`

वैद्यकीय उपचार ७० टक्के कमी किमतीत उपलब्ध,

अशाप्रकारचे औषध लाँच करणारी पहिली कंपनी



पुणे : संशोधनकेंद्रीत जागतिक औषध ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि. (ग्लेनमार्क) या कंपनीने लोकप्रिय मधुमेहरोधी औषध लिराग्लुटाईडचे बायोसिमिलर भारतात प्रथमच सादर केले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) यांच्या मंजुरीनंतर लिराफिट या ब्रँड नावाने या औषधाची विक्री करण्यात येत आहे.

दररोज १.२ मिग्रॅ एवढ्या प्रमाणित डोसची याची किंमत सुमारे १०० रुपये असून यामुळे थेरपीची किंमत अंदाजे ७० टक्क्यांनी कमी होईल आणि ते फक्त प्रिस्क्रिप्शननुसार उपलब्ध असेल. लिराग्लुटाईड हे ग्लुकागॉनसारख्या पेप्टाइड १ रिसेप्टर अॅगोनिस्ट (जीएलपी-१आरए) या श्रेणीशी संबंधित आहे. त्यामुळे ग्लुकोजवर अवलंबून असलेल्या इंसुलिनचा स्राव वाढतो आणि चुकीच्या ग्लुकागॉनचा स्राव कमी होतो. अमेरिका आणि युरोपीय महासंघात टाईप २ मधुमेहाच्या प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी त्याला जागतिक स्तरावर मान्यता देण्यात आली आहे.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड- इंडिया फॉर्म्युलेशनचे अध्यक्ष आणि बिझिनेस हेड आलोक मलिक म्हणाले, ग्लेनमार्कला लिराग्लुटाईड या औषधाचे नाविन्यपूर्ण आणि परवडणारे बायोसिमिलर लिराफिट भारतात प्रथमच सादर करताना अभिमान वाटत आहे.

अॅथेरोस्क्लेरोटिक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (एएससीव्हीडी) आणि लठ्ठपणासह टाईप २ मधुमेह असलेल्या प्रौढ रुग्णांमध्ये ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यास ते मदत करते, असे क्लिनिकल चाचण्यांमधून दिसून आले आहे. लिराग्लुटाईडचा रूग्णांमधील हृदय आणि मूत्रपिंडाच्या सुरक्षेवरही सकारात्मक परिणाम होत असल्याचे क्लिनिकल चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे.

त्यामुळे टाईप २ मधुमेह मेलिटस असलेल्या रूग्णांसाठी तो एक प्रभावकारक पर्याय ठरतो. या लॉन्चसह आम्ही आता इंजेक्शनद्वारे देण्याच्या मधुमेहरोधी औषधांच्या बाजारपेठेत प्रवेश केला असून मधुमेह उपचारांच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

लिराग्लुटाईड आणि टाईप २ मधुमेहाच्या उपचारातील त्याची भूमिका

टाईप २ मधुमेह मेलिटस असलेल्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यासाठी लिराग्लुटाईड परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. टाईप २ मधुमेह मेलिटस असलेल्या भारतीय प्रौढ रूग्णांवरील २४ आठवड्यांच्या कालावधीतील क्लिनिकल चाचण्यांमध्ये हे सिद्ध झाले आहे, की लिराफिट हे परिणामकारक, सुरक्षित आणि सहनयोग्य आहे. लिराग्लुटाईडच्या संदर्भात चाचण्यांमधून निकृष्ट नसलेली परिणामकारकता आणि सुरक्षा प्रोफाइलसुद्धा दिसून आली आहे. टाईप २ मधुमेह मेलिटस असलेल्या रुग्णांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सुरक्षा वाढणे, ग्लायसेमिक पॅरामीटर्स प्रभावीपणे कमी करणे आणि वजन कमी करणे यांचाही लिराग्लुटाईडच्या अतिरिक्त लाभांमध्ये समावेश आहे.

जीएलपी -१ आरए औषधांचा वर्ग आणि त्यांची क्रिया करण्याची यंत्रणा

ग्लुकागॉनसारख्या पेप्टाइड १ रिसेप्टर अॅगोनिस्ट हा टाईप २ मधुमेहाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या औषधांचा समूह आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यामध्ये जीएलपी -१ आरए हे अत्यंत प्रभावी ठरतात. टाईप २ मधुमेह मेलिटस आणि एएससीव्हीडी किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी उच्च जोखीम असलेल्या रुग्णांमध्ये जीएलपी -१ आरए हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम कमी करतात. तसेच आणि टाईप २ मधुमेह मेलिटसच्या रूग्णांमध्ये रक्तातील ग्लुकोज-कमी करण्याच्या प्रभावासोबतच कार्डिओ-रेनल परिणामांवर ते सकारात्मक परिणाम करतात, असे अनेक चाचण्यांनी सिद्ध केले आहे.

ग्लुकोजच्या वाढीव तीव्रतेसमोर इंसुलिनचा स्राव करणे हे त्यांच्या कार्याचे स्वरूप असते. त्यामुळे ग्लुकागॉन स्राव कमी होतो. अॅथेरोस्क्लेरोटिक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि अतिलठ्ठपणा यांसारख्या सहव्याधी असलेल्या टाईप २ मधुमेह मेलिटस रुग्णांसाठी अमेरिकन डायबेटिस असोसिएशन तसेच अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल अँडोक्रिनोलॉजी (एएसीई) कन्सेन्सस स्टेटमेंट आणि युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी यांच्या उपचार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये जीएलपी -१ आरए याची शिफारस करण्यात आली आहे.

अमेरिकन डायबेटिस असोसिएशननेसुद्धा (एडीए) टाईप २ मधुमेह मेलिटसच्या रुग्णांमध्ये वजन कमी करणे टाईप २ मधुमेह मेलिटसच्या रुग्णांमध्ये हायपोग्लायसेमियाचा धोका कमी करण्यासाठी जीएलपी -१ आरए उपचारांची शिफारस केली आहे. या वर्गातील औषधांमध्ये लिराग्लुटाईड, सेमॅग्लुटाईड आणि ड्युलाग्लुटाईड यांचा समावेश होतो.

मधुमेह उपचारांमध्ये ग्लेनमार्कची विशेषज्ञता

मधुमेही रुग्णांसाठी, विशेषत: अनियंत्रित टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी, नवीन, प्रभावी आणि परवडणारे उपचार पर्याय आणण्याची ग्लेनमार्कची मोठी परंपरा आहे. मधुमेह उपचारांमध्ये ग्लेनमार्कची विशेषज्ञता मधुमेही रुग्णांसाठी, विशेषत: अनियंत्रित टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी, नवीन, प्रभावी आणि परवडणारे उपचार पर्याय आणण्याची ग्लेनमार्कची मोठी परंपरा आहे.

डीपीपी४ इनहिबिटर, टेनेलिग्लिप्टीन (झिटा प्लस आणि झिटेन) लाँच करणारे २०१५ मध्ये ग्लेनमार्क ही पहिली कंपनी होती.त्यानंतर टेनेलिग्लिप्टीन +मेटफॉर्मिनचे एफडीसी (झिटा-मेट प्लस आणि झिटेन-एम) लाँच केले.ग्लेनमार्कने नंतर २०१९ मध्ये एक नाविन्यपूर्ण एसजीएलटी-2 इनहिबिटर रेमोग्लिफ्लोझिन (रेमो आणि रेमोझेन) त्यानंतर त्याचे संमिश्रण (रेमो-व्ही,रेमोझेन-व्ही, रेमो एमव्ही आणि रेमोझेन एमव्ही) सादर केले.

ग्लेनमार्कने २०२२ मध्ये सिटाग्लिप्टिन (सिटाझिट आणि त्याचे एफडीसी लाँच केले.त्यानंतर लोबेग्लिटाझोन (एलओबीजी) आणि टेनेलिग्लिप्टीनचे अतिरिक्त एफडीसी आले, त्यात पायोग्लिटाझोन

(झीटा पीआयओ),पायोग्लिटाझोन+मेटफॉर्मिन (झिटा– पियोमेंट)आणि डॅपग्लिफ्लोझिन (झिटा-डी) तसेच

डॅपग्लिफ्लोझिन +मेटफॉर्मिन अशा त्यांच्या संमिश्रणांचा समावेश होता ग्लुकागॉनसारख्या पेप्टाईड-१

रिसेप्टर अॅगोनिस्ट (जीएलपी-१ आरए) असलेले लिराग्लुटाईड (लिराफिट) हे ग्लेनमार्कचे नवीनतम उत्पादन आहे. त्याद्वारे इंजेक्शनद्वारे देण्यायोग्य मधुमेहरोधी औषधांच्या बाजारपेठेत तिचा प्रवेश होत आहे.

भारतात मधुमेहाचा प्रसार

आयसीएमआर-इंडियाबीने ऑक्टोबर २००८ ते डिसेंबर २०२० दरम्यान केलेल्या पाहणीनुसार, मधुमेहाचा एकूण व्यावहारिक प्रसार ११.४ टक्के होता.ऑगस्ट २०२३ मध्ये संपलेल्या (एमएटी ऑगस्ट २०२३) आयक्यूव्हीआयएच्या १२-महिन्यांच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार,

जीएलपी-१ आरएची भारतातील बाजारपेठ २५९ कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. यामध्ये मागील याच कालावधीच्या तुलनेत एमएटी ऑगस्ट २०२३) वार्षिक १०८ टक्के वाढ झाली आहे.

Post a Comment

0 Comments