आमदारांनी सरकारचे चुकीचे काम थांबवावे : माजी राष्ट्रपती वैंकेय्या नायडू

नेशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्सचे उद्घाटन : २०० आमदार उपस्थित


पुणे : "राजकारणात विरोधकांना विरोध करून सरकारला चुकीचे काम करण्यापासून रोखले पाहिजे. पण ते सरकारचे शत्रू नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि त्यांना कायदेमंडळात राहून काम करू दयावे.” असा सल्ला भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आमदारांना दिला.

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्सच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

या वेळी व्यवसायीक सल्लागार व लेखक राम चरण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होराट्टी, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड उपस्थित होते. 

या परिषदेत विधानसभा आणि विधान परिषदेचे सरासरी २०० सदस्य सहभागी झाले होते. ज्यामध्ये देशातीलस सर्व राजकीय पक्षांचे आणि २५ राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले हेाते. त्यात भाजप, काँग्रेस, द्रमुक, एमआयटीसी, आरजेडी, सपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार सहभागी झाले होते. या सर्व आमदारांकडे पीएचडी, पदव्युत्तर, अभियंता, कायदा आणि वैद्यकीय पार्श्वभूमी आहे.

व्यंकय्या नायडू म्हणाले,"आपल्या संबंधित राजकीय पक्षांशी एकनिष्ठ राहा आणि आपले राष्ट्र हे एक पक्ष आणि एक गट आहे जो भारताच्या अंतर्गत एकत्र येतो. आमदारांनी पुन्हा पुन्हा पक्ष बदलल्यास नागरिकांचा राजकारणातील रस कमी होईल आणि ही लोकशाहीसाठी वाईट असेल.”

"आमदारांनी सकारात्मक मानसिकता ठेवून मतदारांच्या प्रश्नांवर चर्चा, वादविवाद आणि निर्णय घ्यावेत, विरोधक आंदोलन करू शकतात आणि सरकारला जबाबदार धरू शकतात. मात्र त्यांनी हे काम लोकशाही पद्धतीने करावे. आपण सर्वांनी सर्वसामान्य नागरिकांचे हित जपले पाहिजे. आमदारांनी जनतेसाठी आदर्श ठरावे. त्यांनी संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणू नये.”

"आपल्या देशात अनेक संधी आहेत पण त्यासोबतच आव्हानेही आहेत. त्या सर्व आव्हानांवर मात करून आपल्याला पुढे जायचे आहे. देशात अनेक पक्ष आहेत पण आपल्या सर्वांचा एकच गट आहे आणि तो म्हणजे भारत. आपल्याला निवडणूक प्रक्रियेतूनच पुढे जायचे आहे. यासोबतच समाजाला विधायक काहीतरी दाखवून विध्वंसक बातम्य न दाखवण्याची जवाबदारही माध्यमांची आहे.”

सतीश महाना म्हणाले,"आमदारांनी लोकशाहीचे मोठेपण समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण एकत्र आलो आहोत त्यामुळे देशाच्या विकासासाठी येथे विचारमंथन होणे गरजेचे आहे. लोकशाही म्हणजे काय आणि देशाचे चार स्तंभ हे समजून घेऊन विकासाची कामे करा. जनतेचा आवाज ऐकणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. राजकीय व्यक्ती सर्व काही करू शकते. म्हणून आपण सर्वाानी एकत्र येऊन पुढे जायला हवे. ”

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,"लोकशाही बळकट व सक्षम करण्यासाठी सुशिक्षित तरूणांनी राजकारणात यावे. शिक्षणासोबतच त्यांना राजकीय प्रशिक्षण ही मिळाले पाहिजे. आज अमेरिकेत दोन पक्षांच्या अस्तित्वामुळे ती प्रगतीच्या मार्गावर आहे. आपल्या देशात असे शेकडो पक्ष आहेत जे लोकशाहीत अडथळे आहेत ”

डॉ. नेहा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments