सुप्रसिद्ध आयात-निर्यात व्यावसायिक हसन जमशेर तडवी यांचे मार्गदर्शन
पुणे - अक्षर मानव ग्रुपचा व्यापार विभाग आणि आयात-निर्यात क्षेत्रातील ट्रेड केअर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आयात-निर्यात या विषयावर मार्गदर्शन देणारी एक आॅनलाईन कार्यशाळा उत्साहात पार पडली. अक्षर मानव ग्रुपमधील सुमारे १०० हून अधिक जणांनी उपस्थिती लावली.
अक्षर मानव ग्रुपच्या वतीने आपल्या सदस्यांना विविध विषयांची माहिती व्हावी, यासाठी सातत्याने विविध प्रकारच्या कार्यशाळा घेण्यात येत असतात. त्यापैकीच ही एक कार्यशाळा रविवार दि. ७ जानेवारी रोजी घेण्यात आली. कार्यशाळेत सर्वप्रथम अक्षर मानव व्यापार विभागाचे राज्य अध्यक्ष परेश गांधी प्रास्ताविक करून कार्यशाळेचा उद्देश्य विशद केला.
त्यांनी सांगितले की, अक्षर मानवमधील सदस्यांना आयात-निर्यात या विषयाची माहिती व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षर मानव कार्यशाळेचे संयोजन लीलाताई सोनवणे यांनी केले.
कार्यशाळेत मार्गदर्शन देताना हसन जमशेर तडवी यांनी सांगितले की, आयात-निर्यात म्हणजे एक वैश्विक व्यापार आहे. या क्षेत्रात आज कोणताही व्यक्ती उतरू शकतो व चांगल्या प्रकारे पैसादेखील कमावू शकतो. फक्त या क्षेत्राची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे.
आयात निर्यात क्षेत्रात प्रवेश करताना आपल्याला निर्यात करावयाचे उत्पादन, त्याची कोणत्या देशात आवश्यकता आहे, कोणत्या देशात कोणते उत्पादन निर्यात करावे, दुसऱ्या देशातील आयातदारांशी संबंध कसे प्रस्थापित करावे, ग्लोबल मार्केटचा अभ्यास कसा करावा, देशोदेशींच्या सरकारांच्या धोरणांचा कोणता अभ्यास करावा व आपल्या देशाच्या आयात-निर्यात धोरणांचा अभ्यास कसा करावा, या विषयी माहिती दिली.
तडवी यांनी सांगितले की, आज भारतातून रस्ते मार्गाने, रेल्वे मार्गाने, जहाजाने आणि विमानानेदेखील विविध प्रकारचा माल निर्यात होतो. निर्यातीच्या क्षेत्रात भारताचा विकास चांगला होतो आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
कार्यशाळेसाठी ट्रेडकेअरचे राहूल पालवे, अक्षर मानव व्यापार विभागाचे उपाध्यक्ष विनोद बर्वे, अक्षर मानव पीआर मीडिया व डिजिटल मार्केटिंगचे राज्य अध्यक्ष सुधीर देशमुख व उमेश बोरकर यांनी परिश्रम घेतले.
या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या अक्षर मानवच्या सदस्यांनी आयात-निर्यातीसंबंधी विचारलेल्या विविध प्रश्नांना हसन तडवी यांनी समर्पक उत्तरे दिली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या कार्यशाळेला उपस्थित राहिलेल्या अक्षर मानवच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
0 Comments