श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे तब्बल ५१ हजार लाडूंचे वाटप

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टचा उपक्रम


पुणे : अयोध्या येथे झालेल्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्ताने श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग यांच्यावतीने दिवाळी व फुलांची होळी एकाच दिवशी साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संस्था, पोलीस बांधव व देवदासी भगिनी यांना तब्बल ५१ हजार लाडूंचे वाटप करून एका आठवडा हा उत्सव साजरा करण्यात आला.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा उत्सव साजरा करण्यात आला. 

अमिता अग्रवाल म्हणाल्या, महालक्ष्मी मंदिरातर्फे आगळ्यावेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये बुधवार पेठेतील देवदासी महिला, पुण्यातील २५ हून अधिक सामाजिक संस्था आणि पोलीस बांधव यांना लाडूचे वाटप करण्यात आले.

मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. नयनरम्य विद्युत रोषणाई आणि दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय  सामूहिक रामरक्षा पठण व हनुमान चालीसा पठण करण्यात आले. तसेच रामाचे कीर्तन व भजन करण्यात आले. दिप लावून दिवाळी आणि फुलांची उधळण करीत होळी साजरा करण्यात आली.

Post a Comment

0 Comments