रोल्‍स-रॉयस स्‍पेक्‍टरचे दक्षिण भारतात पदार्पण


पुणे : स्‍पेक्‍टर या पहिल्‍या फुली इलेक्ट्रिक रोल्‍स-रॉयस कारने दक्षिण भारतात पदार्पण केले.  सर्व रोल्‍स-रॉयस कार्सच्‍या प्रचलित हॉलमार्क्‍ससह स्‍पेक्‍टर अद्वितीय आहे, जेथे या कारमध्‍ये उच्‍च समकालीन डिझाइन, आकर्षक इंटीअरिअर आणि उच्‍च स्‍तरीय रचना आहे. या कारने आधुनिक लक्‍झरीचा शोध घेत असलेल्‍या तरूण, उद्योजक ग्राहकांचे मन व लक्ष वेधून घेतले आहे. 

रोल्‍स-रॉयस मोटर कार्स, चेन्‍नई च्या डिलर प्रिन्सिपल वासंती भूपती म्हणाल्या की रोल्‍स-रॉयसची स्‍पेक्‍टर तिच्‍या विभागातील अद्वितीय कार आहे आणि दुर्मिळ व अत्‍यंत हवीहवीसी वाटणारी आहे. मला रोल्‍स-रॉयससाठी नवीन इलेक्ट्रिक युगाची सुरूवात करण्‍यासाठी चेन्‍नईमध्‍ये या उल्‍लेखनीय मोटर कारला दाखवण्‍याची संधी मिळाल्‍याचा आनंद होत आहे.

२०२१ मध्‍ये रोल्‍स-रॉयस मोटर कार्सने ऐतिहासिक घोषणा केली, ज्‍यामुळे मार्कीच्‍या इतिहासाला कायमस्‍वरूपी नवीन आकार मिळेल. रोल्‍स-रॉयस मोटर कार्सने २०२३ च्‍या चौथ्‍या तिमाहीत पहिल्‍या ग्राहक डिलिव्‍हरींसह ऑल-इलेक्ट्रिक कार स्‍पेक्‍टरची आणि २०२३ पर्यंत मार्कीचा संपूर्ण पोर्टफोलिओ फुली इलेक्ट्रिक असण्‍याची घोषणा करत इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाप्रती आपल्‍या कटिबद्धतेला जाहिर केले.

रोल्‍स-रॉयसच्‍या इतिहासामधील या महत्त्वाच्‍या क्षणासह स्‍पेक्‍टर उल्‍लेखनीय प्रवासावर आहे, जेथे कारने २.५ दशलक्ष किलोमीटर अंतरापर्यंत अत्‍यंत मागणीदायी चाचणीची पूर्तता केली आहे. गेल्‍या ऑक्‍टोबरमध्‍ये स्‍पेक्‍टर वेस्‍ट ससेक्‍स, इंग्‍लंडमधील होम ऑफ रोल्‍स-रॉयस येथे संपूर्ण जगासाठी लाँच करण्‍यात आली आणि जगभरातून सकारात्‍मक प्रतिसाद मिळाला आहे. भारतात किंमत ७.५ कोटी* रूपयांपासून (एक्‍स-शोरूम) सुरू होते. 

Post a Comment

0 Comments