पुणे : राज्याचे माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त बिबवेवाडी येथील आधार मुकबधिर विद्यालयातील मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर राबवण्यात आले.
सारथी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सुरवसे-पाटील यांच्या पुढाकाराने व भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून हे शिबीर घेण्यात आले. यासह विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भारती हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मुकबधिर विद्यार्थ्यांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, भारती हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण जाधव, सारथी फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष दीपक चौघुले, सामाजिक कार्यकर्त्या अमीना भोसले, सुषमा कोंडे, सोनाली फाले, पवन दुर्वे आदी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक जाणीवेतून विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे अनिल सुरवसे-पाटील यांनी सांगितले.
0 Comments