उत्तराखंड टनेल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी..!

काँग्रेसचे राज्य प्रवक्ते’ गोपाळ तिवारी यांची मागणी


पुणे : उत्तराखंड टनेलमधील खोदकाम करणाऱ्या ४१ कामगारांची ‘जीवन मरणाच्या संघर्षातून सुटका झाल्याचे सर्व देशाने पाहीले. त्याबद्दल १७ दिवस राबणाऱ्या सर्व शासकीय व निम शासकीय यंत्रणा व मजुरांनी जे कष्ट घेतले त्या सर्वांचे अभिनंदन व आभार..! मात्र ‘मजुरांवर ही जीवघेणी परिस्थिती का ओढावली? याची चौकशी ही झाली पाहीजे.

सदर टनेलचे खोदकाम करणाऱ्या ‘नवयुग इंजिनिअरींग कंपनीवर’ सरकार काय कारवाई करणार? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे की, सदर टनेलचे खोदकाम ‘नवयुग कंपनीस’ देतांना, त्यांची तांत्रिक क्षमता व अनुभव पाहीले गेले काय? सदर ‘नवयुग कंपनी’ या मजुरांच्या जीवाशी खेळत होती काय? मजुरांच्या जीवाच्या सुरक्षेच्या कोणत्याही ऊपाय योजनांची आखणी करणे सदर कंपनीस गरजेचे का वाटले नाही? नैसर्गिक व पर्यावरणाचे नियम व संकेत तुडवले गेले काय? असे अनेक प्रश्न या दुर्घटनेतून समोर येत असून, मजुरांच्या जीवाशी खेळणाऱ्या व अक्षम्य बेपर्वाई करणाऱ्या (अड़ानी ग्रुप’च्या अघिपत्याखाली असल्याचा आरोप होणाऱ्या) ‘नवयुग इंजिनीअरिंग कंपनी’वर सरकार काय कारवाई कारवाई करणे गरजेचे आहे.

सदर टनेलच्या कामात, ‘मजुरांच्या सुरक्षेची तांत्रिक पूर्वतयारी’ सदर कंपनीने काय व कशा प्रकारे केली होती? त्या ठिकाणी अत्यावश्यक असणारे ह्युम पाईप का लावले गेले नाहीत? सदरचे खोदकाम करण्याच्या कामातील तांत्रिक सुरक्षेच्या बाबींकडे का दुर्लक्ष करण्यात आले का? या बाबी स्पष्ट होऊन दोषींवर तातडीने सक्त कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा कोणाच्या तरी अक्षम्य बेपर्वाई मुळे असे प्रकार पुढील काळात ही घडू शकतात. त्यामुळेच उत्तराखंड टनेल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी तिवारी यांनी या प्रसिद्धिपतत्रकात केली आहे.

मध्यंतरी गुजरात मधील मोरबी पुलाची दुर्घटना ही दुर्लक्षित होऊन दोषींवर कारवाई झाल्याचे पहावयास मिळाले नाही, ही दुर्दैवी बाब असून, संकट पश्चात काळजी घेण्या ऐवजी, संकट पुर्व खबरदारी व नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या ‘जबाबदार सरकारांची’च देशाला खरी तर गरज आहे.

गेल्या ७० वर्षात सरकारच्या बेर्पाईमुळेच, देशांतर्गत पुलवामा, मोरवी, रेल्वे अपघात, ऊत्तराखंड टनेल इ दुर्घटना घडल्याचे पहायला मिळाल्या नाहीत अशी पुस्ती ही त्यांनी जोडली..!

Post a Comment

0 Comments