तीन आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी
पुणे : भारतातील सर्वात मोठा संघटित होम-लिफ्ट ब्रँड, निबाव होम लिफ्ट्सने तीन आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळवली आहेत ज्यामुळे कंपनीला जागतिक बाजारपेठांमध्ये वाढ करण्यास मदत होईल. युरोपियन मानकांचे पालन करून कंपनीला युरोपियन बाजारपेठेतच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत प्रतिनिधित्व मिळवून देणारे कन्फर्मिटी युरोपिनी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
याशिवाय निबाव होम लिफ्ट्सना ऑस्ट्रेलियन स्टँडर्ड्स सर्टिफिकेशन आणि अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स (एएसएमई) यांच्याकडून मान्यता प्राप्त झाली. सर्वात सुरक्षित आणि उत्तम दर्जाची होम-लिफ्ट उत्पादने तयार करण्याऱ्या कंपनीला हे प्रमाणपत्र देण्यात येते.
निबाव होम लिफ्टचे सीईओ आणि संस्थापक विमल आर बाबू म्हणाले, ही प्रमाणपत्रे जगातील प्रगत होम-लिफ्ट उत्पादनांच्या निर्मितीमध्ये निबाव होम लिफ्ट्सची गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालींशी बांधिलकी दृढ करतात. शिवाय, या आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन निबाव होम लिफ्ट्सची पारदर्शकता, सातत्य आणि त्याच्या ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची आणि सुरक्षित होम लिफ्ट प्रदान करण्याच्या समर्पणाला बळकटी देते. या क्षेत्रातील सर्वात किफायतशीर किमतीत, होम लिफ्ट्सला एक अत्यावश्यक ग्राहक बनवण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.
चेन्नईमधील चार अत्याधुनिक उत्पादन सुविधांमधून मासिक ३५० युनिट्सच्या उत्पादन क्षमतेसह, निबाव होम लिफ्ट्सने गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ऑर्डर मुल्यानुसार ३९५.२१ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. अंदाजे ६०० कोटी रुपयांच्या ऑर्डर मुल्याद्वारे चालू आर्थिक महसूल गाठण्याचे उद्दिष्ट आहे.
सुरक्षितता आणि उर्जा कार्यक्षमतेला प्राधान्य देत, निबाव होम लिफ्ट्स उच्च सुरक्षा मानकांचे पालन करते, सुरक्षित आणि सुरळीत घरासाठी सूक्ष्म डिझाइनसह अत्याधुनिक वायु तंत्रज्ञान एकत्रित करते. निबव होम लिफ्ट्स सध्या सिरीज ३ सिरीज ३ मॅक्स, ८ प्रो, आणि सिरीज मॅक्स प्रो यासह घरातील लिफ्ट उत्पादनांची श्रेणी प्रदान करते. निबाव हे जगातील सर्वात वेगाने वाढणारा लोकप्रिय इन-होम लिफ्ट ब्रँड म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत करत आहे.
0 Comments