१९८५ पासून रुग्णसेवेत;भारतातील टॉप फाईव हॉस्पिटलच्या यादीत स्थान
पुणे : नुकत्याच झालेल्या ओएमएस राष्ट्रीय रुग्णालय सर्वेक्षणानुसार भारतातील टॉप फाईव सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या यादीत पुण्यातील एशियन आय स्पेशालिटी या नामवंत हॉस्पिटलचा सामावेश करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित सर्वेक्षणात एशियन आय ने पुण्यात तसेच महाराष्ट्रात नं एक चे स्थान मिळवले आहे.
हॉस्पिटलमध्ये असलेल्या अत्याधुनिक लॅसिक तंत्रज्ञानामुळे लाखो नेत्ररुग्णांना त्याचा उत्तम फायदा झाला आहे. या हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया व डॉ. श्रुतिका कांकरिया यांचा सत्कार मुंबई येथे कॅबिनेट आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 'इंडियाज बेस्ट कॅटरॅक्ट अँड लॅसिक सेंटर' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. या हॉस्पीटलमध्ये मोतिबिंदू, लॅसिक, रेटिना, नेत्ररोपण, तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया तसेच लहान मुलांच्या डोळ्याच्या सर्व प्रकारच्या विकारावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
डोळ्याच्या सर्व प्रकारच्या आजारावर नेत्ररुग्णांना उपचारासाठी अल्पदरात सर्वोत्तम तंत्रज्ञानाची सुविधा कांकरिया परिवाराने हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करुन दिलेली आहे. नेत्ररुग्णांच्या वैद्यकीय सेवेबद्दल एशियन आय हॉस्पिटलला या पुर्वीसुध्दा अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
रशियन आय हॉस्पिटलचा २०१८ साली महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नेत्र रुग्णालय या पुरस्काराने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सर्वोतकृष्ट लॅसिक सेंटर या पुरस्काराने सन्मानित केले. त्यापैकी एशियन पॅसिफिक रिफॅक्टीव्ह सर्जरी अवॉर्ड, युरोपियन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रिफ्रेक्टीव्ह सर्जरी अवार्ड मिळालेले आहेत.
चष्मा काढण्यासाठी सर्वोत्कृष्ठ लेसर स्माईल व काँट्युरा व्हिजन लेसिक तंत्रज्ञान नेत्ररुग्णांसाठी उपलब्ध करण्याचा मान महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट असलेल्या एशियन आय हॉस्पिटलला मिळेलेला आहे. त्याचप्रमाणे डॉ. श्रुतिका वर्धमान कांकरिया यांनी एशियन आय हॉस्पिटलची एक धर्मदाय संस्था एशियन आय फाऊंडेशन सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून सर्व स्तरातील रुग्णांना नेत्र उपचाराची सेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लॅसिक सर्जरी, कॅटरॅक्ट सर्जरी, रेटिना सर्व्हिसेस हे तीन उत्कृष्ठ विभाग एशियन आय हॉस्पीटलमध्ये आहेत. तसेच रोबोटिक प्रेसिजन झेप्टो हा विभाग लवकरच या हॉस्पिटलमध्ये सुरु होणार आहे. डॉ. वर्धमान कांकरिया यांनी १० तास ३१ मिनीटामध्ये १७० लेसर नेत्र शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांची 'लिमका बुक ऑफ रेकॉर्डस्' मध्ये नोंद करण्यात आली आहे.
0 Comments