पुणे : भारतातील आघाडीची ट्रॅक्टर निर्यात कंपनी असणारी सोनालिका ट्रॅक्टर्सने नोव्हेंबर २३ रोजी आतापर्यंतचा सर्वाधिक १६.३ टक्के बाजार हिस्सा मिळवला आहे. सोनालिकाने नोव्हेंबरमध्ये १२,८९१ ट्रॅक्टरची विक्री केली आहे. ज्यामध्ये २३ टक्के ची सर्वाधिक वाढ झाली आहे. २२ नोव्हेंबर रोजी १०,४६४ ट्रॅक्टरची विक्री झाली आहे.
यासह, सोनालिकाने नोव्हेंबर'23 मध्ये उद्योग वाढीच्या तुलनेत (अंदाजे 2%) कामगिरी केली आहे आणि सलग ७ व्या वर्षी सुध्दा १ लाख ट्रॅक्टर विक्रीचा टप्पा पार केला आहे.सणासुदीच्या काळात ग्राहकांची मनपसंत ट्रॅक्टर खरेदी कंपनी असणाऱ्या सोनालिकाने अनुकूल परिस्थिती, वेळेवर उत्पादन उपलब्धता आणि उत्पादन मिश्रण यामुळे कंपनीला तिचा नवीन विक्रीच्या टप्पा गाठता आला.
नवीन उत्कृष्ट कामगिरी कंपनीच्या शेतीच्या जलद वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीशील भविष्याला आकार देण्याच्या दृष्टिकोनातून विचार करते. सोनालिका ट्रॅक्टर्स हे सध्या १५ लाखापेक्षा अधिक शेतकर्यांचे एक मजबूत कुटुंब आहे. आणि त्यांच्या हेवी ड्युटी ट्रॅक्टर्सवर शेतकर्यांच्या वाढत्या आत्मविश्वासाने हा ब्रँड सतत वाढत आहे.
इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड चे सहव्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, नोव्हेंबर २३ मध्ये सर्वाधिक २३ टक्के वाढीसह आमचा आजवरचा सर्वाधिक १६.३ टक्के बाजार हिस्सा मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. आम्ही अवघ्या ८ महिन्यांत १ लाख ट्रॅक्टर विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.
नवीन विक्रमी कामगिरी ही संपूर्ण शेतकरी समुदायाप्रती असलेल्या सोनालिकाच्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा परिणाम आहे. ट्रॅक्टर उद्योगात स्पर्धात्मक वातावरण असूनही उद्योगाच्या वाढीला मागे टाकत आमच्या ट्रॅक्टरने सर्वात योग्य तंत्रज्ञानासह योग्य किमतीसह विस्तृत व डीलर नेटवर्कद्वारे त्यांच्या सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे
0 Comments