* सर्वांना सामावून घेऊन आणि ज्यांची एरव्ही फारशी दखल घेतली जात नाही अशा व्यक्तींसोबत साजरी केली दिवाळी
* मनपा कर्मचारी, अग्निशामक दलातील वीर, ट्रॅफिक पोलीस, हॉस्पिटलमधील अटेंडंटस्, ट्रक चालक यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
* तृतीयपंथी समुदाय तसेच वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमात राहणाऱ्यांमध्ये आनंद पसरवला.
पुणे : लोकांना एकत्र आणण्यासाठी सण साजरे केले जातात आणि आनंद हा वाटल्याने वाढतो. वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला, भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर वी ने दिवाळीमध्ये महाराष्ट्रात एक विशेष उपक्रम राबवून सर्वसामावेशकतेचा संदेश दिला.
वी चे नुकतेच सुरु करण्यात आलेले कॅम्पेन 'बी समवन्स वी' मधून दर्शवण्यात आले की एखाद्या व्यक्तीचा एकटेपणा, इतरांपासून वेगळे असल्याची टोचणी दूर करण्यासाठी आणि कोणाला तरी आपली काळजी आहे हे जाणवून देण्यासाठी एक छोटीशी कृती देखील पुरेशी असते. या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन वी ने आपल्या दिवाळी उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध समुदाय व गटांमध्ये सणाचा आनंद पसरवण्याचे ठरवले. पुणे, औरंगाबाद, नाशिक, अकोला, नागपूर, सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये वी ने हा उपक्रम राबवला.
यंदाच्या सणासुदीच्या काळात 'देण्यातील आनंद' निर्माण करत, या सात शहरांमधील वी कर्मचाऱ्यांनी स्थानिक महानगरपालिका कर्मचारी, अग्निशामक दलाचे वीर, ट्रॅफिक पोलीस आणि हॉस्पिटल अटेंडंटस् यांच्याशी संवाद साधला व त्यांच्यासाठी दिवाळी खास बनवली.
त्यांना दिवाळीची मिठाई व भेटवस्तू दिल्या, त्यांचे काम आणि योगदान याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हा उत्सव त्यांच्यासाठी अधिक संस्मरणीय बनवला. वी कर्मचार्यांनी महाराष्ट्रातील तृतीयपंथी समुदाय तसेच वृद्धाश्रमांमधील ज्येष्ठ नागरिक आणि अनाथाश्रमातील मुलींसाठी दिवाळीची मिठाई आणि भेटवस्तू देऊन दिवाळीचा आनंद, आपलेपणाची उब त्यांच्यामध्ये पसरवली.
महाराष्ट्रवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना, वोडाफोन आयडिया लिमिटेडचे महाराष्ट्र व गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड रोहित टंडन यांनी सांगितले, "दिव्यांचा उत्सव संपूर्ण देशभरात अतिशय उत्साहाने साजरा केला गेला. सध्या सुरु असलेले आमचे कॅम्पेन बी समवन्स वी ला अनुसरून यंदाच्या दिवाळीत आम्ही लोकांना सामावून घेण्यासाठी, एकटेपणा, वेगळे असल्याची भावना दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
आम्हाला आशा आहे की, वी ने लोकांना इतरांच्या जीवनात थोडा तरी आनंद निर्माण करण्याची प्रेरणा दिली आहे आणि हे सुनिश्चित केले आहे की, प्रत्येकासाठी हा सणासुदीचा काळ आनंदी असेल आणि कोणालाही एकाकी वाटणार नाही.”
'बी समवन्स वी' हे कॅम्पेन विविध परिस्थितींमुळे वंचित राहिलेल्या लोकांपर्यंत दिवाळीचा आनंद व उबदारपणा पोहोचवण्याचे सामूहिक प्रयत्न दर्शवते. समाजातील सर्व सदस्यांसोबत एकजुटीने आणि सर्वसमावेशकतेच्या भावनेने राहण्याची वी ची वचनबद्धता यामधून अधोरेखित केली जाते.
0 Comments