पुणे : भारतातील ऑटोमोटिव्ह रिफिनिश सोल्यूशन्सची अग्रगण्य कंपनी असलेल्या पीपीजी एशियन पेंट्सने पुुणे, एनआयबीएम येथे अत्याधुनिक प्रमुख सेंटरची सुरूवात करून प्रीमियम कार डिटेलिंग आणि सजावट क्षेत्रातील व्यवसाय असलेल्या कार्टिसनचा आरंभ केला.
अनेक जागतिक स्वयंचलित वाहन उत्पादकांचे केंद्र असल्यामुळे पुण्याला भारताचे डेट्रॉईट असेही म्हटले जाते. हा आरंभ म्हणजे हे शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या क्षेत्राच्या स्वयंचलित वाहनांच्या सौंदर्याची गरज पूर्ण करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
कार्टिसनमुळे पुण्यातील कार डिटेलिंगच्या क्षेत्रात क्रांती होणार असून यामुळे वाहनांचे रूप आणि रक्षण यांमध्ये सुधारणा करण्यासाठी असलेल्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. पेंट प्रोटेक्शन फिल्म्सपासून सेरॅमिक कोटिंग्जपर्यंत, पेंट करेक्शनपासून ते अंतर्गत सफाईपर्यंत, स्वच्छता आणि गंजविरोधी प्रक्रियेपर्यंत, कार शौकिन आणि मालकांच्या विशिष्ट गरजा कार्टिसनच्या अत्याधुनिक केंद्रात पूर्ण केल्या जातील.
पीपीजी एशियन पेंट्सचे सीईओ जितेंद्र कालरा म्हणाले. पुण्यातील कार्टिसनच्या आरंभामुळे या शहरातील स्वयंचलित वाहनांच्या वाढत्या बाजारपेठेची पूर्तता करण्याची आमची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे. स्वयंचलित वाहन उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुण्याचे स्थान हे पीपीजी एशियन पेंट्समध्ये आमच्या नाविन्यपूर्ण आफ्टरमार्केट उपाय पुरवण्याच्या ध्येयाशी अगदी सुसंगत आहे. कार शौकीन आणि मालक या दोघांचाही वाहनाचा अनुभव उन्नत करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.
कार्टिसनच्या पुण्यातील आगमनातून पश्चिम भारतातील कार केअरचा दर्जा उंचावण्यासाठी आमची कटिबद्धता दिसून येते. तसेच, या गतिमान बाजारपेठेच्या गरजांना अनुरूप सर्वांगीण आणि वैयक्तिक सेवा देण्याचे आमचे धोरणही प्रतिबिंबित होते, अद्वितीय अशा डेकोर ऑफरमुळे कार्टिसन वेगळी ठरते. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे सौंदर्यमूलक आकर्षण आणि वैयक्तिक स्वरूप आणखी उठून दिसेल.
कारमालकांना उत्तम प्रमाणात कस्टमाईजेशन करण्याची मुभा देणे, ही कार्टिसनची ओळख आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिक आवडीनिवडीनुसार आपल्या वाहनांचे स्वरूप आणि अनुभव यांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते.
पीपीजी एशियन पेंट्सची स्थापना फेब्रुवारी १९९७ मध्ये झाली होती. विविध बाजारपेठांमध्ये रंग आणि कोटिंग्जची अग्रगण्य कंपनी म्हणून तिने आपले स्थान बळकट केले आहे. यात स्वयंचलित वाहन ओईएम, स्वयंचलित वाहनांचे रिफिनिशेस, औद्योगिक, सागरी आणि पॅकेजिंग बाजारपेठांचा समावेश आहे. हा संयुक्त उद्यम जगातील अग्रगण्य कोटिंग कंपनी पीपीजी इन्कॉर्पोरेट आणि भारताची सर्वात मोठी रंग व कोटिंग उत्पादक कंपनी एशियन पेंट्स लिमिटेड यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचे एक उदाहरण आहे.
0 Comments