सोनालिका ट्रॅक्टर ने मिळवला १५ टक्के बाजार हिस्सा


पुणे : भारताचा क्रमांक १ चा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेली सोनालिका ट्रॅक्टर्सने आतापर्यंतच्या बाजारपेठेतील एकंदर वाट्यापैकी १५ टक्के एवढ्या सर्वोच्च वायटीडी (एप्रिल-ऑक्टोे २३ ) ची नोंद केली असूनस ती बाजारपेठ वाटा वाढविणाऱ्या सर्वोच्च कंपन्यांमध्ये तिला स्थान मिळाले आहे.

देशांतर्गत उद्योगातील अग्रगण्य कामगिरी करणाऱ्यांमध्ये कंपनीचे स्थान कायम आहे. या असामान्य कामगिरीमध्ये ऑक्टोेबर २०२३ मधील विक्रमी एकंदर १८,००२ ट्रॅक्टर विक्रीचाही समावेश आहे. 

शेतकऱ्यांच्या समृद्धतेसाठी असलेल्या दृढ कटिबद्धतेमुळे सोनालिका ही सणाचा मोसम आणखी भव्य करण्यासाठी आणि शेतीतील यांत्रिकीकरणाचा अंगीकार करण्यात शेतकऱ्यांना आणखी मदत करण्यासाठी अधिक सज्ज आहे. भौगोलिक वैविध्याचा परिणाम न होता शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी कंपनीच्या हेवी ड्यूटी ट्रॅक्टर श्रेणीची रचना ही सर्वात प्रगत शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आली आहे. 

सोनालिकाने तिच्या हेवी ड्यूटी ट्रॅक्टर रेंजवर ‘हेवी ड्यूटी धमाका’ अंतर्गत पूर्वी कधीही न आलेल्या हंगामी ऑफर्स आणि आकर्षक वित्त पुरवठा योजनाही देऊ केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी समुदायाल नवीन तंत्रज्ञाना स्वीकार करणे शक्य होईल.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले की , अग्रगण्य कंपन्यांपैकी देशांतर्गत विक्रीतील वाढीची नोंद करणारा एकमेव ब्रँड असल्याचा आम्हाला अभिमान आहे. सणांच्या काळातील मागणी बघता आम्ही गेल्या काही महिन्यांपासूनच तयारी सुरू केली होती आणि आमची उत्पादने व विक्री टीम तसेच डिलर पार्टनर यांच्या धोरणांमध्ये समन्वय केला होता.

वेळेवर ट्रॅक्टरची डिलिव्हरी व्हावी यासाठी आम्ही सर्व राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीच्या मॉडेलची उपलब्धता राहील, याची निश्चिती केली होती. यावर्ष उत्सवांचा हंगाम दीर्घकाळ असल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील काळात हेवी ड्यूटी ट्रॅक्टरमुळे उत्साही वातावरण मिळत राहील, याची निश्चिती आम्ही करू.”

Post a Comment

0 Comments