पुणे : रेणूकॉर्प या आघाडीच्या रिअल इस्टेट विकास कंपनीला आपल्या रेणूकॉर्प एम्परर हाउसिंग इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी या उपकंपनी अंतर्गत शिवम डायनेस्टी हा नवीन पुनर्विकास प्रकल्प सुरू झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. सत्यम शिवम सुंदरमच्या सौंदर्याची प्रेरणा घेऊन रहिवाशांना राहण्यासाठी एक आलिशान आणि सुसंवादी जागा उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
आपल्या विस्तार योजनांचा एक भाग म्हणून, रेणूकॉर्पने अलीकडेच आपल्या रेणूकॉर्प अँड जय डेव्हलपर्स या उपकंपनी अंतर्गत आपल्या आगामी प्रकल्पासाठी अकोला येथे जमीन संपादित केली आहे. ही धोरणात्मक वाटचाल कंपनीच्या वाढीसाठी आणि उच्च-गुणवत्तेच्या मालमत्ता विकासाप्रती बांधिलकी दर्शवते. याव्यतिरिक्त, कंपनी चिखलीमध्ये आपला नवीन उपक्रम जाहीर करण्यासाठी उत्सुक आहे, आणि या भागांत आपले स्थान आणखी बळकट करत आहे.
रेणूकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वैभव वानखडे म्हणाले की , आपल्या कामकाजाला बळकटी देण्याबरोबरच वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रेणूकॉर्प मुंबई आणि पुणे येथे दोन नवीन कार्यालये स्थापन करण्याची योजना आखत आहे.
ही कार्यालये केवळ कंपनीच्या कामकाजासाठी केवळ मुख्य केंद्र म्हणून काम करणार नाहीत तर ग्राहकांचा सहभाग आणि सहकार्य करणारे केंद्र म्हणूनही काम करतील. शिवाय, कंपनीची विदर्भ आणि मराठवाडा विभागातील ग्राहकांना कार्यक्षम सेवा प्रदान करण्यासाठी अकोला आणि चिकली येथे उप-कार्यालये स्थापन करण्याची योजना आहे.
आपल्या वृद्धी योजनांची कास धरतांना आपल्या सांघिक रचनेमध्ये ३५ टक्क्यांनी वाढ करण्याचे रेणूकॉर्पचे उद्दिष्ट आहे. कंपनी अपवादात्मक प्रकल्प आणि ग्राहकांचे समाधान देण्यासाठी कुशल आणि समर्पित कर्मचार्यांचे महत्त्व ओळखते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या सांघिक रचनेचा जास्तीत जास्त पर्याप्त उपयोग करून घेण्यासाठी तसेच संस्थेमध्ये उच्च स्तरावरील कौशल्य सुनिश्चित करण्यासाठी रेणूकॉर्प नामांकित सल्लागार सेवांकडून सक्रिय सहाय्य घेऊन घेत आहे.
रेणूकॉर्प आपल्या अखंडता, गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान या मूलभूत मूल्यांसाठी वचनबद्ध आहे. शिवम डायनेस्टी आणि मुंबई, पुणे, अकोला आणि चिखली येथे आपल्या विस्ताराच्या योजना सुरू केल्यामुळे, कंपनी रिअल इस्टेट उद्योगात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी सज्ज आहे.
0 Comments