बजाज फिनसर्व्ह असेट मॅनेजमेंटतर्फे बँकींग आणि पीएसयू फंड लाँच


वैशिष्ट्ये : 

* एनएफओ २६ ऑक्टोबर २०२३ ला सुरु होणार आणि ६ नोव्हेंबर २०२३ ला बंद होणार

* निधी साठी आधारभूत निर्देशांक निफ्टी बँकींग आणि पीएसयू कर्ज दर्शक

* प्रारंभ शुल्क (एंट्री लोड) लागू नाही आणि निगर्मन अधिभार शून्य


पुणे : बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटने बजाज फिनसर्व्ह बँकींग अॅण्ड पीएसयू फंड ही आपली चौथी निश्चित उत्पन्न गुंतवणूक योजना बाजारात आणली आहे. गुंतवणूकदारांना उत्पन्न निर्मितीसाठीचा एक उत्तम मार्ग प्रदान करण्याच्या हेतूने या गुंतवणूक संधीची रचना करण्यात आलेली आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूक विभागामध्ये उच्च पातळीवरील कर्जविषयक गुणवत्ता असल्याची खात्री देत निश्चित उत्पन्नामध्ये गुंतवणूक करण्याची संधी देणे, हा या फंडाचा हेतु आहे.

कर्जविषयक जोखीम सौम्य करताना नियमित परताव्याची शक्यता हा फंड उंचावतो. उत्पन्न वक्राच्या (यील्ड कर्व्ह) आधारे वाटचाल करत राहण्याच्या दृष्टीकोनातून या फंडाची रचना करण्यात आलेली असून सुमारे पाच वर्षाच्या मूदतपुर्तीवर त्याचा भर असल्याने कार्यक्षमतेची क्षमता अधिकाधिक उंचावते. तसेच सध्याच्या बाजारात जेथे उत्पन्न वक्र मोठ्या प्रमाणात सपाट आहे, तेथे गुंतवणूकदारांना अधिकाधिक जोखीम-परतावा प्रदान करतो.

अपेक्षित वक्र खालच्या दिशेला गेल्याने होणारा लाभ आणि उदयोन्मुख बाजार बंध निर्देशांकात भारताचा समावेश यासारख्या घटकांमुळे संभाव्य भांडवल वाढीचा लाभ घेण्याची संधी बजाज फिनसर्व्हची ही गुंतवणूक योजना गुंतवणुकदारांना देते. तसेच, मध्यम-ते-दीर्घ मुदतीत रोखे रॅलीच्या दृष्टीकोनासह उत्पन्नाची सरासरी पूर्वपदावर येण्याच्या स्थितीमुळे बाजाराशी संबंधित (मार्क-टू-मार्केट) वाजवी नफ्याची शक्यताही प्रदान करते.

मध्यम ते दीर्घकालीन कालावधीसाठी गुंतवणुकीचा दृष्टीकोन बाळगून असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना संभाव्य फायद्याचा प्रस्ताव ठरू शकतो. नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटचे सीईओ गणेश मोहन म्हणाले, “आमच्या बँकिंग आणि पीएसयू फंडाने गुंतवणूकदारांना व्यावसायिक फंड व्यवस्थापनाच्या फायद्यांचा आनंद प्रदान करताना बँकिंग आणि पीएसयू क्षेत्रात उपलब्ध असलेल्या निश्चित उत्पन्न गुंतवणूक संधींचा लाभ घेण्याचे दरवाजे उघडले आहेत.

आपल्या भांडवलासाठी तुलनेने स्थिर गुंतवणूक पर्याय हवा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा अतिशय योग्य पर्याय आहे. अन्य पारंपारिक बँकिंग पर्यायांव्यतिरिक्त विविध कर्जरोखे प्रकारातील गुंतवणुकरुपी विभागामध्ये विविधता आणण्यात स्वारस्य असलेल्या गुंतवणूकदारांसाठीही हा फंड एक आकर्षक प्रस्ताव ठरु शकतो.”

बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटचे सीआयओ निमेश चंदन नवीन फंडाविषयी माहिती देताना म्हणाले, “हा फंड उच्च कर्ज दर्जा राखताना ८० टक्के निधी बँका तसेच पीएसयू कंपन्यांच्या उच्च दर्जाच्या कर्जरोख्यांत तर उर्वरित २० टक्के निधी सार्वभौम आणि अन्य उच्च दर्जाच्या कजरोख्यांत गुंतविला जाणार आहे.

ते पुढे आणखी माहिती देताना म्हणाले, “कर्जाची उच्च गुणवत्ता, उच्च कामगिरीची क्षमता आणि बाजारातील कौशल्य या सर्व घटकांचे विचारपूर्वक संयोजन हा बँकींग आणि पीएसयू फंड प्रदान करत आहे. आपल्या निश्चित उत्पन्नाच्या विभागामध्ये विविधता हवी असलेल्या त्याचबरोबर विकसित होत असलेल्या गुंतवणुकीच्या विश्वात संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय प्रदान करत आहे.”

फंडाचे व्यवस्थापन निश्चित उत्त्पन्न विभागाचे सिनीअर फंड मॅनेजर श्री. सिद्धार्थ चौधरी आणि सीआयओ श्री. निमेश चंदन यांच्याद्वारे संयुक्तपणे केले जाणार आहे. नवीन फंड प्रारंभिक गुंतवणूकीसाठी २५ ऑक्टोबरला सुरु करण्यात आला असून झाला असून येत्या ६ नोव्हेंबर २०२३ ला बंद होणार आहे. त्यानंतर तो चालू आधारावर किंवा १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी गुंतवणूकीसाठी खुला होईल.

Post a Comment

0 Comments