१ ते ३ डिसेंबर रोजी ऑटो क्लस्टर येथे होणार तीन दिवसीय प्रदर्शन
या वेळी उपस्थित आयोजक पदाधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल सविस्तर बोलताना सांगितले की, इलेक्ट्रिकल वाहन निर्मिती मध्ये बॅटरी टेक्नॉलॉजी महत्वाची असून. बॅटरी व्यवस्थापन प्रणाली या तंत्रण्यांचा वापर करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात बॅटरी व्यवस्थापन प्रणाली च्या १३ तज्ज्ञांची समिती येणार असून विविध विषयांवर ते चर्चा करणार आहेत.
चाकण औद्योगिक क्षेत्र कमालीची प्रगती करत असल्यामुळे. या प्रदर्शनाला त्याचा खूप फायदा होणार असल्याचे विलास रबडे म्हणाले. महाविद्यालयीन शिक्षणात बदल करून येणाऱ्या पिढीला टेक्नॉलॉजी विषय जास्त माहिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.
भारताची इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ आता मर्यादित राहिलेली नाही; हा उद्योग भरभराटीचा असून त्याने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात सध्या अंदाजे २.८ दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने वापरात असून ही बाजारपेठ अधिक वाढीसाठी सज्ज झाली आहे. असेही त्यांनी सांगितले.
फ्युचर्स ग्रुप इव्हेंट ऑर्गनायझिंग कंपनी चे संचालक नमित गुप्ता यांनी सांगितले की, वर्ष २०३० पर्यंत ९४.४ टक्के अशा उल्लेखनीय चक्रवाढ वार्षिक वाढीचा (सीएजीआर) अंदाज असून यातून हे निदर्शनात येते की, इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतो आहे आणि यातूनच शाश्वत विकासासाठी देशाची वचनबद्धता अधोरेखित होत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, २०२१-२२ मध्ये ८,६६८ वाहनांची नोंद झाली होती. प्रमुख वाहन निर्मिती केंद्र असलेले पुणे इलेक्ट्रिक वाहनातील संशोधन, नावीन्यता आणि उत्पादनात आघाडीवर आहे.
इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेच्या वाढीमागे उत्पादन, संशोधन आणि विकासातील पुण्याचे कौशल्य हे प्रेरणादायी आहे, ज्यामुळे ‘आयआयईव्ही’चे आयोजन करण्यासाठी हे उत्तम स्थळ आहे. ‘आयआयईव्ही’मध्ये उपस्थितांना अद्ययावत ईव्हीचा अनुभव घेण्याची, तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि इलेक्ट्रिक वाहतुकीचे भविष्य शोधण्याची संधी मिळेल.
0 Comments