टाटा क्लिक पॅलेटने पुण्यामध्ये सुरू केले ओम्नी-चॅनेल ब्युटी स्टोर

मुंबईत मिळालेल्या यशानंतर आता पुण्यातील कोपा मॉलमध्ये दुसरे स्टोर सुरु

पुणे :  भारताचे ब्युटी मॅचमेकर आणि टाटा समूहातील एक सदस्य, टाटा क्लिक पॅलेटने आपले दुसरे, नवे ओम्नी-चॅनेल ब्युटी रिटेल स्टोर पुण्यातील कोपा मॉलमध्ये सुरु केले आहे.

नवी मुंबईतील नेक्सस सीवूड मॉलमध्ये पहिल्या स्टोरला मिळत असलेल्या भरघोस यशापासून प्रेरणा घेऊन दुसरे स्टोर सुरु करून ब्रँडने आपल्या विस्ताराची आगेकूच कायम राखली आहे. ग्राहकांना त्यांचे परफेक्ट ब्युटी मॅच मिळवण्यात मदत करण्यासाठी, त्यांची आवड, गरजा पूर्ण करणारा, अस्सल ब्युटी अनुभव प्रदान करून, तंत्रज्ञानाचा सहज उपयोग करत ऑफलाईन ब्युटी रिटेलमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या ब्रँडच्या प्रयत्नांमध्ये हा खूप महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

टाटा क्लिक पॅलेटचे असे मत आहे की, सौंदर्य हा एक अतिशय वैयक्तिक अनुभव आहे आणि म्हणूनच आपल्या आधुनिक एआय सक्षम ब्युटी आयडी तंत्रज्ञानासह हा प्लॅटफॉर्म एक वैयक्तिक अनुभव प्रदान करतो, जो ग्राहकांना त्यांच्या विशेष गरजांना अनुरूप अनोखा ब्युटी मॅच मिळवण्यात मदत करतो.

तंत्रज्ञानावर आधारित आणि कन्टेन्ट फॉरवर्ड स्ट्रॅटेजीसह, टाटा क्लिक पॅलेट ब्रँड हा अनुभव स्टोर आणि एक्स्पेरिएन्शिअल झोनमार्फत जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. 

या स्टोरमध्ये पॅलेट मॅच फाईंडर आहे, ज्यामध्ये एआय-व्हीआर-लेड मेक-अप ट्रायल्स आणि स्किन ऍनालायजर मिरर्सचा वापर केला जातो, ज्यामुळे ग्राहक मेक-अप उत्पादनांना व्हर्च्युअली ट्राय ऑन करू शकतात. पर्यावरणाप्रती जागरूक दृष्टिकोनासह ग्राहक विविध लूक्स आणि उत्पादने ट्राय करू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांचे परफेक्ट ब्युटी मॅच सहजपणे शोधता येते.

पॅलेट ब्युटी कन्सोल ग्राहकांच्या विशेष गरजा पूर्ण करणाऱ्या वैयक्तिक उत्पादनांची शिफारस करते, यासाठी हे कन्सोल लिंग, वय आणि त्वचेचा प्रकार अशी माहिती जमा करते. चेहरा स्कॅन करून त्वचेच्या आरोग्याचे गहन विश्लेषण देखील हे कन्सोल करते. इथल्या गिफ्टिंग एरियामध्ये गिफ्टिंगची कारणे, मूड्स आणि वैयक्तिक आवडनिवड यांच्या आधारे कस्टम गिफ्ट बॉक्सेस बनवले जाऊ शकतात. याखेरीज स्टोरमध्ये ब्रँड सहयोग आणि लॉन्चसाठी एक सतत विकसित होणारी हाय-एंगेजमेंट स्पेस देखील आहे, जी सणांच्या क्यूरेटेड कहाण्यांसाठी एक व्यापक वातावरण प्रदान करते.

नवीन स्टोर सुरु करण्याबाबत टाटा क्लिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोपाल अस्थाना यांनी सांगितले, "पुण्यामध्ये टाटा क्लिक पॅलेटचे दुसरे स्टोर सुरु करण्याचा निर्णय ब्रँडच्या विस्ताराच्या दृष्टीने आनंददायी तर आहेच, शिवाय उत्साहवर्धक देखील आहे कारण यामुळे ब्युटी रिटेल अनुभवाची नवी व्याख्या रचण्याच्या मिशनला पुढे नेण्याच्या ब्रँडच्या उद्देशाला चालना मिळते.

पुण्यामध्ये हे आमचे पहिले स्टोर आहे, जे तंत्रज्ञानावर आधारित ओम्नी-चॅनेल मंच प्रदान करण्याची आमची बांधिलकी दर्शवते, याठिकाणी सौंदर्य प्रेमी उत्कृष्ट सौंदर्य उत्पादने शोधू शकतील, इतकेच नव्हे तर, आपल्या अनोख्या गरजा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आत्मविश्वासाने निवड करण्यासाठी स्वतःला शिक्षित देखील करू शकतात. याठिकाणी आम्ही आमच्या ग्राहकांना एक असामान्य ब्युटी शॉपिंग अनुभव प्रदान करण्यासाठी उत्सुक आहोत."

या ब्युटी डेस्टिनेशनमध्ये मेकअप, त्वचेची काळजी, केसांची काळजी, सुगंध, टूल्स आणि ऍक्सेसरीज यासारख्या विविध श्रेणींमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत ब्रँड उपलब्ध आहेत. स्टोरवर येणारे ग्राहक कोणतेही शुल्क न भरता एक्स्प्रेस मेक-अप सेवा देखील आजमावून पाहू शकतात.

नवीन स्टोरच्या शुभारंभाच्या निमित्ताने ब्रँडने ग्राहकांसाठी आकर्षक ब्रँड व स्टोर एक्सक्लुसिव्ह ऑफर्स देखील ठेवल्या आहेत.

आपले परफेक्ट ब्युटी मॅच मिळवण्यासाठी कृपया इथे या - टाटा क्लिक पॅलेट, जी - २९, तळमजला, कोपा बाय लेकशोर, कोरेगांव पार्क, पुणे – ४११००१

Post a Comment

0 Comments