टॉर्क मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नवीन इको+राइड मोड केला उपलब्ध

रेंजसह क्राटोस आरचा अनुभव आणखी उंचावण्यासाठी 


पुणे : टॉर्क मोटर्स या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनीने क्राटोस आर या आपल्या प्रमुख उत्पादनात नवीन इको+ राइड उपलब्ध करून देत नवा टप्पा पार केला आहे. हा नवीन राइड मोड बाइकची रेंज वाढवणारा असून त्यामुळे रायडर्सना एकाच चार्जमध्ये शहरी भागात सहजपणे १५०+ किमी अंतर पार करता येणार आहे.

नवीन राइड मोड क्राटोस आरची रियल वर्ल्ड रेंज त्याच्या प्रती चार्ज १८० किमीच्या आयडीसी आकडेवारीच्या जास्त जवळ आणेल. इको+ मोडमुळे क्राटोस आर आधीपासून देत असलेल्या इको, सिटी आणि स्पोर्ट या तीन रायडिंग मोड्समध्ये वैविध्य येणार आहे. रायडर्सना आता क्राटोस आरची कामगिरी पूर्ण क्षमतेसह अनुभवता येणार आहे.

इको+ त्याच्या ३५ किमी प्रती तास वेगामुळे शहरी भागातील रायडर्ससाठी अगदी योग्य आहे, कारण तिथे वाहतूक कोंडीमुळे कामगिरीवर मर्यादा येतात आणि त्यापेक्षा कार्यक्षमता जास्त गरजेची ठरते.

नवीन वैशिष्ट्याविषयी टॉर्क मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शेळके म्हणाले, ‘इको+ मोड ग्राहकांच्या मागणीतून तयार झालेला आहे. शहरी भागात राहाणाऱ्या ग्राहकांची विशिष्ट रायडिंग परिस्थितीमध्ये जास्त रेंजची मागणी होती तसेच गरजेनुसार जास्त कामगिरी करणाऱ्या मोडमध्ये लगेच स्विच करता येण्याचा पर्यायही हवा होता.

त्यांना आपल्या आवडीनुसार या मोडमध्ये जास्तीत जास्त रेंज मिळवता येईल किंवा फक्त एका स्विचच्या मदतीने मोटरसायकल स्पोर्ट मोडमध्ये नेत पूर्ण क्षमतेचा वापर करता येईल. त्याशिवाय मध्यम स्थिती हवी असलेल्या रायडर्ससाठी आम्ही यात इको आणि सिटी मोडही दिलेला आहे.’

प्रत्येक नव्या क्राटोस आरमध्ये चार डायनॅमिक रायडिंग मोड आणि अतिरिक्त रिव्हर्स मोड दिलेला आहे, ज्यामुळे रायडरची सोय होते, विशेषतः सोयीस्करपणे पार्किंग करता येते. इको+ मोड क्राटोस आर असलेल्या ग्राहकांसाठीही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

क्राटोस आरमध्ये ९केडबल्यू एक्सियल फ्लक्स मोटर देण्यात आली आहे, जी ३८ एनएमचा टॉर्क आणि ९६ टक्के एफिशियन्सी रेटिंग देते. १८० किमीच्या प्रभावी आयडीसी रेंजमागे आयपी६७ रेटेड ४.० केडब्ल्यूएच लि- आयन बॅटरी पॅकसह हे पॉवरट्रेन समीकरण आहे.

ट्रेंडसेटिंग डिझाइन आणि दमदार पॉवरट्रेन यांसाठी प्रसिद्ध असलेली क्राटोस आर प्रीमियम, शहरी मोटरसायकल म्हणून सर्वोत्तम असून कामगिरी, कार्यक्षमता आणि हाताळणीबाबतीत दर्जेदार आहे. टॉर्क मोटर्स इलेक्ट्रिक मोटरसायकल क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्णता आणत असून पर्यावरणपूरकता आणि रायडिंगचा थरारक व स्टायलिश अनुभव यामुळे ती रायडर्सच्या पसंतीची ठरेल.

Post a Comment

0 Comments