`VI` ने आयएमसी २०२३ मध्ये सादर केल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुविधा

अधिक चांगले जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर


पुणे : तंत्रज्ञान आणि 5G यांच्या परिवर्तनात्मक व अमर्याद क्षमतेवर भर देत VI ने विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आजवर प्रदर्शित केल्या आहेत, ज्या सर्व उद्योग क्षेत्रे, ग्राहक व समुदाय विकासामध्ये उपयोगी पडत आहेत. 

यात पुढील टप्पा म्हणून VI ने नुकतेच भारतातील पहिले प्रगत पोर्ट मॅनेजमेंट आयओटी सोल्यूशन्स म्हणून `संचार शक्ति` सादर केले आहे. हे एक अभिनव, एन्ड-टू-एन्ड मल्टीमोडल लॉजिस्टिक सोल्युशन आहे जे देशातील बंदरे अधिक स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम बनवते.

देशाच्या राजधानीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयएमसी २०२३ ला भेट देणाऱ्यांसाठी ५जी इमर्सिव्ह अनुभव निर्माण केला.  फक्त 'टेल्को' बनून न राहता, 'टेकको' अर्थात तंत्रज्ञान कंपनी म्हणून परिवर्तन करण्याच्या आपल्या व्हिजनला अनुसरून, आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने टेलिकॉम क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी) २०२३ मध्ये आपल्या युजर्ससाठी लाईव्ह ५जी अनुभव प्रस्तुत केला आहे.

२७ ते २९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान नवी दिल्लीमध्ये प्रगती मैदानावर इंडिया मोबाईल काँग्रेस २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. आपले भागीदार आणि इकोसिस्टिममधील इतर कंपन्यांच्या सहयोगाने वी ने विविध उद्योगक्षेत्रे, ग्राहक व समुदाय विकासाशी संबंधित यूज केसेसची वैविध्यपूर्ण श्रेणी विकसित केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ५जी नेटवर्कची परिवर्तनात्मक शक्ती यामधून दर्शवली जात आहे.

आयएमसी २०२३ चे उदघाटन आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी वी बूथला भेट दिली, ज्याठिकाणी ब्रँडने 'इनोव्हेशन फॉर अ बेटर लाईफ' या संकल्पनेंतर्गत विविध अत्याधुनिक सुविधा, उपाययोजना प्रदर्शित केलेल्या आहेत. माननीय पंतप्रधानांनी वी ची दोन अनोखी सोल्युशन्स 'इनोव्हेशन इन टेक्नॉलॉजी फॉर पब्लिक गुड' आणि 'संचार शक्ती' यांची माहिती करून घेतली.

वी नेटवर्कचा वापर करत पंतप्रधान मोदी यांनी 'इनोव्हेशन इन टेक्नॉलॉजी फॉर पब्लिक गुड' यूज केसचा अनुभव घेतला, ज्यामध्ये त्यांना वाराणसीतील सेवापुरी आणि अराजी लाईन ब्लॉकमधील लोकांची माहिती घेतली ज्यांना वी फाउंडेशनच्या रोजगार, शिक्षण आणि डिजिटल-आर्थिक साक्षरता उपक्रमांचा लाभ मिळालेला आहे.

जन कल्याण - जन विकास या सिद्धांताला अनुसरून सुरु करण्यात आलेल्या गुरुशाला, जादू जीनी का आणि स्मार्टऍग्री या तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांचा लाभ उत्तर प्रदेशातील १३.५ लाखांपेक्षा जास्त लोकांना तर देशभरातील २ कोटींपेक्षा जास्त लोकांना मिळत आहे, ज्यामुळे त्यांची एकंदरीत जीवन गुणवत्ता सुधारत आहे, डिजिटल समावेशाला व सर्वसमावेशक समुदाय विकासाला चालना मिळत आहे.

Post a Comment

0 Comments