`अर्था व्हेंचर फंड-१` ने प्रथमच एक्झिटची घोषणा केली

एव्हरेस्ट फ्लीटमधून अंशतः एक्झिट करताना १९ पट परताव्याची नोंद


● अर्था व्हेंचर फंडने या अंशतः एक्झिटमधून १०५ टक्के चा आयआरआर आणि १९ पट एमओआयसी  ची नोंद केली.

● पुण्यातील उल्लेखनीय गुंतवणूकदारांमध्ये क्विकहील टेक्नॉलॉजीजचे श्री. कैलाश काटकर, क्रेन सीपीईचे श्री. हरी जिनागा यांचा समावेश आहे

● १०० हून अधिक कंपन्यांचा पोर्टफोलिओ असलेल्या अर्था ग्रुपसाठी ही ३१ वी एक्झिट आहे.

● एव्हरेस्ट फ्लीटने उबेर आणि पॅरॅगॉन पार्टनर्स यांच्या नेतृत्वाखालील फेरीत २ कोटी डॉलरची गुंतवणूक मिळविली आहे.


पुणे : मुंबईस्थित प्रारंभिक टप्प्यातील मायक्रोव्हीसी, अर्थ व्हेंचर फंड (एव्हीएफ), ने त्यांच्या गुंतवणुकीवर १९ पट परतावा मिळवित फ्लीट मॅनेजमेंट कंपनी एव्हरेस्ट फ्लीटमधून लक्षणीय निर्गमन करण्याची घोषणा केली आहे.

एव्हरेस्ट फ्लीटने अलीकडे उबेर आणि पॅरागॉन भागीदारांच्या नेतृत्वाखालील बी सीरीजच्या फेरीत २ कोटी डॉलरची गुंतवणूक मिळविली आहे. या पार्श्‍वभूमीवर, या उपक्रमातून अंशत: बाहेर पडल्यामुळे  एव्हीएफ ला (आतापर्यंत) १०५ टक्के आयआरआर प्राप्त झाला आहे. शिवाय, एव्हीएफ सोबत एव्हरेस्ट फ्लीटमध्ये सुरुवातीला गुंतवणूक करणार्‍या अनेक गुंतवणूकदारांनीसुद्धा या फेरीत अंशतः एक्झिटचा पर्याय निवडला आहे.

अर्थ व्हेंचर फंडाला सिडबी, शुची कोठारी,  एसएटी चे  नरेंद्र कर्नावत, क्विकहील टेक्नॉलॉजीजचे श्री. कैलाश काटकर आणि क्रेन सीपीईचे श्री. हरी जिनागा यांच्यासारख्या गुंतवणूकदारांचे समर्थन असून त्यांनी एव्हीएफ मध्ये गुंतवणूक केली आहे.

अर्थ व्हेंचर फंडचे व्यवस्थापकीय भागीदार अनिरुद्ध अशोककुमार दमाणी म्हणाले, एव्हरेस्ट फ्लीटशी आमचा संबंध वेगळाच आहे. या उपक्रमाने साथीच्या आजारादरम्यान अशक्यप्राय वॉटणाऱ्या आव्हानांचा सामना केला, त्यामुळे मोठा धक्का बसला. तरीही, संस्थापक मंडळीची चिवटता आणि प्रयोगशील मानसिकता उठून दिसली. 

पारंपारिकपणे भांडवल-केंद्रित क्षेत्रामध्ये ॲसेट –फायनान्सिंग मॉडेलवर त्यांचा मुख्य भर असल्यामुळे लक्षणीय प्रमाणात भांडवल मोकळे झाले आणि त्यांना ॲसेट-लाईट मॉडेलमध्ये संक्रमण करणे शक्य झाले. एव्हरेस्ट फ्लीट केवळ त्याच्या डोमेनमध्ये आघाडीवरच नाही तर त्यांनी सलग दोन वर्षे नफाही कायम राखला आहे.

सुरुवातीला, एव्हरेस्ट फ्लीट ही कंपनी पारंपारिक व्हेंचर कॅपिटल गुंतवणुकीच्या साच्याला अनुकूल नव्हती. मात्र संस्थापकाच्या दृष्टिकोनाची जोड मिळून शाश्वत नफ्यावर लक्ष केंद्रित केल्याने एव्हीएफ चा त्यामध्ये रस वाढला. एव्हरेस्ट फ्लीटमधील गुंतवणुकीच्या तीन फेऱ्यांमध्ये एव्हीएफची कटिबद्धता कायम असण्याने हा विश्वास अधोरेखित झाला आहे.

दमाणी यांनी स्पष्ट केले, एव्हरेस्ट फ्लीटशी आमचा संबंध सामान्य नव्हता. केवळ तंत्रज्ञान-प्रथम दृष्टिकोनावरच नाही तर त्यांच्या मजबूत बिझिनेस मॉडेलवर आमचा विश्वास होता. स्टार्टअप्सना केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याची गरज नाही; तर प्रत्यक्ष मानवी आव्हानांना सामोरे जाणेही खूप महत्त्वाचे आहे, हे आमचे तत्त्वज्ञान या एक्झिटमधून अधोरेखित झाले आहे.

प्राथमिक संस्थात्मक बीज गुंतवणूकदार म्हणून २०१९ मध्ये एव्हरेस्ट फ्लीटसह प्रवास सुरू केल्यानंतर  एव्हीएफ  ही या कंपनीच्या उत्क्रांतीची प्रत्यक्ष साक्षीदार ठरली आहे. कंपनीकडील काहीशे गाड्यांच्या माफक ताफ्याची दमदार ११००० पेक्षा अधिक गाड्यांपर्यंत वाढ झाली. हा कंपनीच्या वेगाचा आणि धोरणात्मक आधाराचा पुरावा आहे.

एव्हरेस्ट फ्लीटमधून बाहेर पडल्याने अर्था समूहाच्या वाढत्या संख्येत भर पडली असून १०० हून अधिक स्टार्टअप्सचा समावेश असलेल्या तिच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमधून ही ३१ वी एक्झिट आहे. या महत्त्वाच्या टप्प्याचे स्मरण करत असताना, अर्था ग्रुप अर्थ व्हेंचर फंड II या आपल्या पुढील प्रारंभिक टप्प्यातील मायक्रोव्हीसीचा आरंभ करण्यासाठी आपली उर्जा केंद्रीत करत आहे.

भारत, यूएस, इस्रायल, आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये पसरलेल्या गुंतवणुकीसह आणि १००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणारा हा समूह अर्थ व्हेंचर फंड, अर्थ इंडिया व्हेंचर्स, अर्थ सिलेक्ट फंड आणि नव्याने सादर झालेलल्या अर्था कंटिन्युम फंड या संस्थांसाठी मूळ संस्था म्हणून काम करतो.  हा कौटुंबिक कार्यालये आणि युएचएनआय एस यांना लक्ष्य करणारा एक क्युरेट केलेला उपक्रम असून त्याचा उद्देश वाढीवर केंद्रित असलेल्या उपक्रमांचा ब्रिज राऊंडमध्ये थेट सहभाग सुलभ करणे हा आहे.

Post a Comment

0 Comments