'वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टीम'मुळे ऊर्जा बचतीत वाढ व कार्बन उत्सर्जनात कपात

*  'गोदरेज अॅंड बॉयस'च्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे १७०० केडब्ल्यूएच उर्जेची बचत

* 'CO2'चे उत्सर्जन वर्षाकाठी ४६५ टनांनी कमी.

मुंबई : 'गोदरेज अॅंड बॉयस'चा एक व्यवसाय असलेल्या 'गोदरेज इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स'तर्फे भारतातील एका आघाडीच्या शीतपेय उत्पादकाच्या कारखान्यामध्ये 'गोदरेज वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टीम' बसविण्यात आली. त्यातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे शाश्वत औद्योगिक पद्धतींचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा शाश्वत उत्पादन पद्धतींसाठी दृढपणे कटिबद्ध असलेल्या 'गोदरेज अॅंड बॉयस'ने तत्सम प्रक्रियांमधून कार्बन डायॉक्साईडचे (सीओटू) उत्सर्जन एक लाख टनाने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याची गरज या बाबी लक्षात घेता, ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी जागतिक पातळीवर बरेच प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी स्पर्धात्मक धार कायम राखून दीर्घकालीन खर्चात बचत करण्याकरीता भारतातील औद्योगिक क्षेत्रामध्येही परिवर्तन होत आहे. याच अनुषंगाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

औद्योगिक प्रक्रियांमध्ये अनेकदा विपुल प्रमाणात उष्णता निर्माण होते. ती सर्वसाधारणपणे वातावरणात पसरते. 'वेस्ट हीट रिकव्हरी' या प्रणालीमध्ये औद्योगिक कारखान्यातील ही वाया जाणारी उष्णता रोखून धरली जाऊन ती पुन्हा वापरली जाते. उष्णता या मौल्यवान संसाधनाला पर्यावरणात विसर्जित होऊ देण्याऐवजी, तिचे रुपांतर अतिरिक्त उर्जेमध्ये किंवा विद्युत व यांत्रिक शक्तीमध्ये केले जाते.

या अतिरिक्त उर्जेचा उपयोग करून औद्योगिक कारखाने आपली एकूण ऊर्जा कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारू शकतात. परिणामी ऊर्जा नव्याने निर्माण करण्याचा खर्च कमी होतो आणि कार्बन उत्सर्जनही लक्षणीयरीत्या कमी होते. 'गोदरेज इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स'ने भारतातील एका प्रमुख जागतिक पेय उत्पादक कंपनीमध्ये हीच गोदरेज वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टीम यशस्वीरित्या स्थापित केली आहे.

'गोदरेज इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स'ने या पेय उत्पादक कंपनीसाठी स्थापित केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे या कारखान्यात दररोज १७५० केडब्ल्यूएच इतकी ऊर्जा वाचविली जात आहे. ही प्रणाली बसविल्यापासून या कारखान्यातील ३७९ एमडब्ल्यूएच इतक्या ऊर्जेची एकूण पुनर्प्राप्ती झाली असून 'सीओटू'चे उत्सर्जनही वार्षिक ४६५ टन या प्रमाणात घटले आहे. हा परतावा कालावधी १.५ वर्षांपेक्षा कमी ठरतो.

आपल्या व्यवसायाच्या या नवीन उपक्रमावर भाष्य करताना, 'गोदरेज इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स'चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख राघवेंद्र मिरजी म्हणाले, “गोदरेज वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टीमसारख्या नाविन्यपूर्ण उपायांमुळे शाश्वत औद्योगिक पद्धतींबद्दलचे व औद्योगिक परिप्रेक्ष्यातील पर्यावरण रक्षणाचे आमचे धोरण प्रतिबिंबित होते.

ऊर्जेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वाया जाणाऱ्या उष्णतेचा वापर करून आम्ही केवळ कार्यान्वयीन खर्चच कमी केला नाही, तर जगभरातील उद्योगांसाठी एक जाज्वल्य उदाहरणदेखील ठेवले आहे. हरीत स्वरुपाच्या, अधिक शाश्वत अशा भविष्याकडे वाटचाल करणे हे आमचे ध्येय आहे. या भविष्यामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करणे ही केवळ एक गरज नसून एक सामायिक जबाबदारीही आहे आणि बचत केलेली प्रत्येक वॉटइतकी उर्जा ही आपल्या उज्ज्वलतेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.”

Post a Comment

0 Comments