बडोदा बीएनपी पारिबा म्युच्यूअल फंडातर्फे बडोदा बीएनपी पारिबा स्मॉल कॅप फंड लाँच

मुदतमुक्त समभाग श्रेणीतील योजना प्रामुख्याने स्मॉल-कॅप समभागांत गुंतवणूक करणार


पुणे : बडोदा बीएनपी पारिबा म्युच्यूअल फंडाने स्मॉल कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारा बडोदा बीएनपी पारिबा स्मॉल कॅप हा नवीन फंड बाजारात गुंतवणूकदारांसाठी आणला आहे. ही नवीन योजना मुदतमुक्त समभाग श्रेणीतील योजना आहे.

या फंडाचे व्यवस्थापन वरिष्ठ फंड व्यवस्थापक शिव चनानी  हे सांभाळणार आहेत. शिव यांना मिड आणि स्मॉल कॅप समभागांतील  गुंतवणूकीचा २४ वर्षांपेक्षा अधिक सखोल अनुभव आहे. या नवीन फंडासाठी निफ्टी स्मॉल कॅप २५० हा निर्देशांक आधारभूत निर्देशांक राहणार आहे.

स्मॉल-कॅप फंडाचे काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

1. फंड आपली ६५ टक्क्यांपेक्षा अधिक निव्वळ मालमत्ता स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणार आहे

2. समभाग निवडीसाठी बॉटम-अप म्हणजे पाया ते कळस पद्धतीचा अवलंब हा फंड करेल. मजबूत मूलभूत स्थिती, व्यवसायाचे दर्जेदार प्रारूप आणि मजबूत व्यवस्थापन चमू असलेल्या कंपन्यांची निवड करण्यावर भर दिला जाईल.

3. फंड विशिष्ट्य उद्योग क्षेत्रावर अवलंबून नसेल.

4. भविष्यात प्रमुख कंपन्या म्हणून उदयास येण्याची क्षमता असलेल्या छोट्या कंपन्यांना शोधून काढत त्याच्यातील गुंतवणूकीआधारे गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करणे हे या फंडाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.


बडोदा बीएनपी पारिबा म्युच्यूअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सोनी नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी म्हणाले, बडोदा बीएनपी परिबास स्मॉल कॅप फंड हा प्रामुख्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या संरचनात्मक वाढीच्या संधीचा फायदा घेऊ पाहणारा एक आदर्श पर्याय आहे. स्मॉल कॅप विभाग विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीचे आकर्षक पर्याय मिळवून देतो आणि तुलनेने वाढीचा उच्च दर हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे.

गत १० वर्षांमध्ये निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांकाने तब्बल २१ टक्के चक्रवाढ दराने वार्षिक परतावा दिलेला आहे. आमचा विश्वास आहे की, बीएमव्ही (व्यवसाय, व्यवस्थापन आणि मूल्यमापन), जोखीम व्यवस्थापनाची मजबूत चौकट आणि एक अनुभवी गुंतवणूक चमू यावर लक्ष केंद्रित करणारी आमची शिस्तबद्ध गुंतवणूक प्रक्रिया गुंतवणूकदारांना उत्तम सेवा देण्यासाठी सुस्थितीत आहे.

भारतीय शेअरबाजाराच्या माध्यमातून दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना अतिशय उत्तम पर्याय आहे. स्मॉल कॅप समभागांमध्ये सामान्यत: उच्च वाढीची क्षमता असते, परंतु अल्प मुदतीत ते अधिक चढउतार दर्शवतात आणि म्हणून गुंतवणूकदारांनी तीन वर्षांपेक्षा जास्त गुंतवणूकीच्या कालावधीचा विचार केला पाहिजे.

सदर योजनेचा एनएफओ ६ ऑक्टोबर २०२३ रोजी खुला होत असून येत्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी बंद होईल. ही योजना पुढील दोन योजना सादर करते: बडोदा बीएनपी परिबा स्मॉल कॅप फंड - नियमित योजना आणि बडोदा बीएनपी परिबास स्मॉल कॅप फंड - थेट योजना. प्रत्येक योजनेत भांडवल वृध्दी आणि उत्पन्नाचे वितरण तथा भांडवल काढून घेणे (आयडीसीडब्लू) हे पर्याय आहेत.

आयडीसीडब्लूमध्ये दोन पर्याय देण्यात आलेले आहेत: वितरीत उत्पन्न खात्यावर जमा करणे तथा भांडवल काढून घेण्याचा पर्याय आणि दुसरा प्रकार म्हणजे वितरीत उत्पन्नाची फेरगुंतवणूक करणे तथा भांडवल काढून घेणे हा राहणार आहे.  

Post a Comment

0 Comments