पुणे : देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या किरकोळ विक्री साखळ्यांपैकी एक मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने, महाराष्ट्रात आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची आणि त्यायोगे ४,००० नोकऱ्यांच्या निर्मितीची अलीकडेच घोषणा केली.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने यापूर्वीच महाराष्ट्रात विविध ठिकाणी स्टोअर्स उभारून ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या लक्षणीय संधी निर्माण झाल्या आहेत. मलाबार गोल्ड अँड डायमंड सध्या महाराष्ट्रात २० स्टोअर्स चालवत असून, पुढील तीन वर्षांत ही संख्या ४५ पर्यंत वाढवण्याची तिची योजना आहे.
महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच महाराष्ट्रातील बारामती येथे नव्याने सुरू झालेल्या दालनाला भेट दिली. मुंबईतील अंधेरी पूर्व येथे मलबार नॅशनल हब (एम-एनएच) या भारतातील कामकाजाच्या मध्यवर्ती केंद्राच्या नुकत्याच झालेल्या उद्घाटन अलिकडेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या अत्याधुनिक सुविधेच्या कार्यान्वयनाचे औचित्य साधतच श्री. अजित पवार यांची ही सदिच्छा भेट घडून आली आहे.
भेटीदरम्यान, श्री. पवार यांनी दालनाचा फेरफटका मारला आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या मानक शुद्धता आणि पारदर्शक किंमतींवर दर्जेदार दागिने तसेच जागतिक दर्जाच्या खरेदीचा अनुभव देण्यासाठी सतत सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी उपस्थित विक्रेता संघाचे अभिनंदन आणि कौतुकही केले.
या भेटीबद्दल भाष्य करताना, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री, श्री. अजित पवार म्हणाले, मला बारामती येथील या स्टोअरला भेट देऊन नक्कीच आनंद झाला आहे आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्स दागिन्यांच्या व्यापाराला बळकटी देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. अत्यंत प्रभावित करणारी गोष्ट ही की, यातून देशाच्या आभूषण कारागिरीला आणखी चालना मिळेल.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची मजबूत उपस्थिती राज्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावेल. दागिन्यांच्या व्यापारात परिवर्तन, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्याची त्यांची भूमिका निश्चितच कौतुकास पात्र आहे.
मलाबार समूहाचे अध्यक्ष श्री. एम. पी. अहमद म्हणाले, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे बारामतीच्या शोरूममध्ये स्वागत करणे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांची उपस्थिती आणि प्रोत्साहनपर शब्द आम्हाला बारामती आणि महाराष्ट्रातील ग्राहकांची अत्यंत समर्पणाने आणि तन्मयतेने सेवा करण्यास आणखी प्रेरित करतील. आमची उपस्थिती निर्माण करण्यासाठी आणि मुंबईत मलाबार नॅशनल हब (एम-एनएच) स्थापन करण्यात सतत पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभार मानू इच्छितो.
तब्बल ६,२५५ चौरस फुटांमध्ये पसरलेले, बारामती स्टोअर सर्वात मोठी रचनात्मक विविधता तसेच दागिन्यांसाठी वाजवी किंमत प्रदान करते. दागिन्यांचे घडणावळ शुल्कही वाजवी फक्त ४.९ टक्क्यांपासून सुरू होते. हे स्टोअर सोने, हिरे, मौल्यवान रत्न, प्लॅटिनम, चांदी आणि बरेच काही यातील वधू, पारंपारिक, समकालीन आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांची उल्लेखनीय श्रेणी प्रदर्शित करते.
माईन डायमंड ज्वेलरी, एरा अनकट डायमंड ज्वेलरी, डिव्हाईन इंडियन हेरिटेज ज्वेलरी, एथनिक्स हॅण्डक्राफ्टेड अँटिक ज्वेलरी कलेक्शन, प्रिसिया प्रिशिअस जेमस्टोन ज्वेलरी, झौल लाइफस्टाइल ज्वेलरी, विराज पोल्की ज्वेलरी यांसारख्या मलबार गोल्ड आणि डायमंड्सच्या लोकप्रिय उप-ब्रँड्समधून निवडलेल्या डिझाइन्सचे प्रदर्शन देखील हे दालन करते.
समूहाच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने हे देखील जाहीर केले आहे की, ते बारामती स्टोअरद्वारे कमावलेल्या नफ्यातील ५ टक्के हिस्सा या प्रदेशातील विविध सेवाभावी आणि परोपकारी उपक्रमांना देणार आहेत.
0 Comments