* शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुस्तक दानासाठी उपलब्ध करवून दिली तंत्रज्ञान सुविधा
* यावर्षीच्या 'टीचर्स डायरी' चे प्रकाशन - देशभरातील, लक्षणीय कामगिरी बजावणाऱ्या
शिक्षकांच्या सन्मानार्थ विशेष पुस्तक
विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पुस्तकांचा लाभ सहजपणे घेता यावा यासाठी आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ची सीएसआर संस्था, वी फाउंडेशनने 'डोनेट बुक' (www.donatebook.in) ही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करवून दिली आहे.
'डोनेट बुक' हा एक पुस्तक दान मंच आहे जो पुस्तके दान करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, पुस्तके ज्यांना हवी आहेत अशा संस्था/शाळा आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांना एकत्र जोडतो. हा उपक्रम वी फाउंडेशनच्या कनेक्टिंग फॉर गुड प्रोग्रामअंतर्गत सुरु करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे पुस्तके उपलब्ध आहेत आणि ज्यांना पुस्तकांची गरज आहे अशा व्यक्तींच्या मध्ये दुवा निर्माण करणे हे या प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे.
या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ शिक्षक दिनी करण्यात आला. प्रसिद्ध कवी पद्मश्री श्री सुरेंदर शर्मा, कन्टेन्ट क्रिएटर, व्यावसायिक आणि शिक्षक श्री. रिषभ जैन, वोडाफोन फाउंडेशनचे संचालक आणि वोडाफोन आयडियाचे चीफ रेग्युलेटरी व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर श्री. पी बालाजी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी वी फाउंडेशनने 'टीचर्स डायरी' देखील प्रकाशित केली.
भारतातील विविध भागांमधील उल्लेखनीय व प्रेरणादायी शिक्षकांच्या सत्य कथांची ही 'टीचर्स डायरी' शिक्षणक्षेत्रात त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करते. विद्यार्थ्यांच्या जीवनावर सखोल प्रभाव निर्माण करणाऱ्या आणि राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानार्थ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येते.
वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी आणि कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर, श्री पी बालाजी यांनी या उपक्रमाविषयी सांगितले, "वोडाफोन आयडिया फाउंडेशनमध्ये आम्ही शिक्षणावर विशेष भर देतो. आम्ही असे मानतो की, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने शिक्षणाची गुणवत्ता सुधारते आणि ज्यांना फारशा तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध नाहीत अशा वंचित समुदाय व ग्रामीण भागांमध्ये त्या पोहोचवल्याने मुलांवर होणारा शिक्षणाचा प्रभाव वाढतो.
याच उद्देशातून डोनेट बुक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आम्हाला असे दिसून आले आहे की, समाजात अनेक अशा व्यक्ती आहेत की ज्यांना पुस्तके दान करून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची इच्छा आहे. आम्ही अशा व्यक्तींना पुस्तकांचे दान अगदी सहजपणे करता येईल यासाठी सोपी व सहज उपलब्ध होणारी यंत्रणा प्रस्तुत करत आहोत.
पुणे व जयपूर शहरांपासून सुरुवात करून येत्या काही महिन्यांत देशभरातील विविध शहरे व नगरांमध्ये आम्ही ही सुविधा पोहोचवू. पहिल्या वर्षभरात १ लाख पुस्तके दान करून ५०,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे हे आमचे उद्दिष्ट आहे. याबरोबरीनेच शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आम्ही 'टीचर्स डायरी' पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये देशातील विविध आदर्श शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला आहे. देशाच्या कल्याणासाठी निस्वार्थ काम करणाऱ्या शिक्षक समुदायाचा सन्मान आम्ही यामधून करत आहोत."
पुस्तक दान करणे आणि ते मिळवणे ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पडावी यासाठी डोनेट बुक प्लॅटफॉर्मवर अशा व्यक्तींचे नेटवर्क एकत्र जोडले जाते जे पुस्तक दानासाठी अथक प्रयत्नशील असतात.
पुस्तक दान करू इच्छिणाऱ्यांसाठी : पुस्तके दान करू इच्छिणाऱ्या व्यक्ती या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करून पुस्तके दान करू शकतील. त्यांनी या प्लॅटफॉर्मवर पुस्तके दान करण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर वी फाउंडेशन आपले अंमलबजावणी सहयोगी मोइनी फाउंडेशन यांच्या मदतीने त्यांच्या घरून पुस्तके गोळा करून, पुस्तकांची ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत ती पोहोचवतील. ज्याठिकाणी अंमलबजावणी सहयोगी पोहोचू शकत नसतील तिथे डोनेट बुक प्लॅटफॉर्म (www.donatebook.in) पुस्तके कुरियर करण्याचा पर्याय देईल. एका विशिष्ट ठिकाणी पुस्तके कुरियर केली की तिथून फाउंडेशन ती पुस्तके जमा करेल.
ज्यांना पुस्तके हवी आहेत अशा व्यक्तींसाठी: ज्यांना पुस्तके हवी आहेत अशा संस्था किंवा शाळा या पोर्टलवर एक अभियान सुरु करून लोकांना पुस्तके दान करण्याची विनंती करू शकतील. त्यांच्या या विनंतीला लवकरात लवकर प्रतिसाद मिळावा यासाठी वी फाउंडेशन व मोइनी फाउंडेशन त्यावर लक्ष ठेवतील व त्याचे व्यवस्थापन करतील.
पुस्तक दान करणे हे एक सत्कृत्य आहे पण त्याच बरोबरीने पुस्तक योग्य स्थितीत आहे आणि ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल याची खात्री करून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी 'डोनेट बुक' मध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मोबाईल रेस्पॉन्सिव्ह वेब इंटरफेस आहे त्यामार्फत दान केल्यापासून पुस्तक अंतिम लाभार्थीला मिळेपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे व्यवस्थापन केले जाते.
0 Comments