'ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज-२०२३'च्या विजेत्यांची झाली घोषणा

'ब्रिलिओच्या'या एकमेवाद्वितीय स्वरुपाच्या 'नॅशनल स्टेम चॅलेंज'मध्ये वर्षभरात २०

राज्यांतील २,५००हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग


पुणे : ब्रिलिओ या माहितीतंत्रज्ञानकंपनीनेआयोजित केलेल्या नॅशनल स्टेम चॅलेंजच्या तिसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा आज पुण्यात करण्यात आली. ब्रिलिओ ही एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रातील सेवा व सोल्यूशन्स पुरविणारी संस्था असून तिने स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे चॅलेंज आयोजित केले होते.शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेमविषयकशिक्षण रुजविण्याचे काम 'स्टेम लर्निंग' करते. 

विज्ञान आणि गणिताच्या मॉडेल स्पर्धा, तंत्रज्ञानविषयक प्रश्नमंजुषा आणि अभियांत्रिकीमधील प्रयोग असे उपक्रम या स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) संबंधितस्पर्धेच्याअनुषंगाने गेले वर्षभर घेण्यात आले होते.त्यांचा अंतिम समारोप आज झाला. या महाअंतिम फेरीत १३ राज्यांच्या २० शाळांमधील १३० विद्यार्थीआणि ४० शिक्षक उपस्थित होते.

कौशल्य विकासावर भर असणारी 'ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज' ही एक अनोखी राष्ट्रीय स्पर्धा आहे. भारतभरातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील पात्र, वंचित विद्यार्थ्यांना 'स्टेम' शिक्षणाचा एक अद्वितीय स्वरुपाचा मंच या स्पर्धेमधून उपलब्ध होतो. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, नावीन्य आणि डिझाइनथिंकिंगचे कौशल्य या गोष्टी वाढवण्याच्या दृष्टीने 'नॅशनल स्टेम चॅलेंज' रचण्यात आलेलेअसते.

स्पर्धेच्या उपांत्य फेरीत २० राज्यांतील २,५००हून अधिक विद्यार्थ्यांना ब्रिलिओ आणि 'स्टेम लर्निंग'च्या स्वयंसेवकांद्वारे नवीन-युगातील तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले. या विद्यार्थ्यांनी ७०हून अधिक विभागीय व राज्यस्तरीय फेऱ्यांमध्ये भाग घेतला. महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, आसाम, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि तामिळनाडू या १३ राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या अव्वल ५० संघांनी राष्ट्रीय अंतिम फेरीत स्थान मिळविले.

विज्ञान, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मान्यवर या प्रसंगी पंच आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी उपसंचालक अनंत विश्वनाथ पत्की, इस्रो तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे माजीउपसंचालकएम. सी. उत्तम, आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र (आयुका) येथील शास्त्रज्ञ प्रवीण चोरडिया, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, विजयभूमी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू अनिलराव पायला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मद्रास येथील प्रा. डॉ. जितेंद्र संगवई, बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटीमधील दिल्ली पब्लिक स्कूलच्या फुलब्राइ टस्कॉलर आणि प्राचार्या अनुपमा रामचंद्र यांचा समावेश होता. 

तरुण मनांच्या उल्लेखनीय कामगिरीचे साक्षीदार होणे प्रेरणादायी : पत्की

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी उपसंचालक अनंत विश्वनाथ पत्की यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना म्हटले, “या तरुण मनांच्या उल्लेखनीय कामगिरीचे साक्षीदार होणे प्रेरणादायी आहे. त्यांच्या कल्पक उपायांमधून आपल्या या भावी 'स्टेम'नायकांमधील असीम क्षमता दिसून येतात. वंचित मुलांना स्टेममधील संधी उपलब्ध झाल्यास त्यांना समान पातळीवर येण्यास आणि गंभीर विचार, समस्यांची सोडवणूक व विश्लेषणात्मक कौशल्ये वाढवण्यास कशी मदत होते, याचे उदाहरण ही स्पर्धा देते. सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांच्या पलीकडे जाण्यास मदत करूनअसे उपक्रम उत्कट, प्रेरित आणि नाविन्यपूर्ण गुण असलेल्यांसाठी नवीन भवितव्य खुले करू शकतात. 'इस्रो'मधील आमच्यासंघांनायाविद्यार्थ्यांशीजोडणारेहेगुणविशेष.”

प्रज्ञावंत विद्यार्थी स्टेम क्षेत्रांमध्ये नवीन कल्पनायांचे योगदान देऊ शकतात : पराग काळकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरूडॉ. पराग काळकरम्हणाले, “नावीन्यता आणि आर्थिक वाढ यांसाठी बळकट स्वरुपाचे 'स्टेम'मधील मनुष्यबळ निर्माण होणे आवश्यक आहे. वंचित मुलांमधील क्षमता जोपासून ब्रिलिओ आणि स्टेम लर्निंग या संस्था विविध प्रकारच्या प्रतिभा शोधण्यात मदत करीत आहेत. हे प्रज्ञावंत विद्यार्थी स्टेम क्षेत्रांमध्ये नवीन दृष्टीकोन आणि कल्पनायांचे योगदान देऊ शकतात, तसेच उद्याच्या शोध आणि प्रगती यांकरीता मार्ग प्रशस्त करू शकतात. वंचित विद्यार्थ्यांना 'स्टेम'मधील ज्ञान उपलब्ध करून कुशल व पात्र असा कर्मचारीवर्ग निर्माण करणे हे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठीदेखील महत्त्वाचे आहे.”

नाविन्यपूर्ण उपायांच्या कल्पनेने मी खरोखरच प्रभावित : संदीप राणे

'ब्रिलिओ'चे जागतिक डिलिव्हरीप्रमुख संदीप राणे म्हणाले, “या विद्यार्थ्यांनी ज्या नाविन्यपूर्ण उपायांची कल्पना केली आहे, त्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे. नॅशनल स्टेम चॅलेंजच्या माध्यमातून गुणवान मुलांच्या प्रतिभेला खतपाणी घालण्यात येते. या मुलांना फक्त संधीची गरज असते. हा उपक्रम डिजिटल तफावत कमी करण्यासाठी आणि भविष्यातील तंत्रज्ञान-चालित जगात प्रगती साधण्यासाठी महत्त्वाचा आहे. आवश्यक ती कौशल्ये मिळून ज्ञान विकसित करण्याची संधी सर्व तरुणांना मिळेल यासाठी आमचे हे प्रयत्न सुरू असतात. ते सार्थकी लागतात, हा अनुभव आम्हाला वर्षानुवर्षे येत आहे. 'स्टेम'नायकांच्या पुढच्या पिढीला प्रेरित करण्याची संधी मिळाल्याने आम्ही आनंदी आणि सन्मानित आहोत."

नॅशनल स्टेम चॅलेंजची तिसरी आवृत्ती यशस्वीपणे झाल्याचा आनंद : आशुतोष पंडित

'स्टेमलर्निंग'चे संस्थापक आशुतोष पंडित म्हणाले, “नॅशनल स्टेम चॅलेंजची तिसरी आवृत्ती यशस्वीपणे पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे. या उपक्रमामुळे भारतातील दूरदूरच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठीचे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. पुढील दशकात निर्माण होणाऱ्या ८० टक्के नोकऱ्यांसाठी गणित आणि विज्ञानातील विशिष्ट कौशल्ये आवश्यक असतील, असा एक अहवाल आहे. सरकारी शाळांमधील सर्वात महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, मार्गदर्शन देण्यासाठी, पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि स्टेमविषयांमध्ये विद्यार्थ्यांची रुची निर्माण करून ती जोपासण्यासाठी आम्ही ब्रिलिओसोबत मिळून काम करीत आहोत. सध्याच्या नोकरीच्या बाजारपेठेत सर्वात जास्त मागणी असलेल्या कौशल्यांशीत्यांना सुसज्ज करण्यासआणि आवश्यक सहाय्य देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."

नॅशनल स्टेम चॅलेंजमध्ये भाग घेणे हा अविस्मरणीय प्रवास

सुचित्रा के, गव्हर्नमेंट हायस्कूल कोणाप्पाना अग्रहारा येथील विद्यार्थिनी म्हणाली, “नॅशनल स्टेम चॅलेंजमध्ये भाग घेणे हा माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी एक अविस्मरणीय प्रवास होता. वास्तविक-जगातील समस्या सोडवायच्याअसतीलतरकोणतेहीस्वप्नफार मोठे नसते,हे आम्हाला या चॅलेंजने शिकवले आहे. या चॅलेंजमुळेआमची क्षितिजे विस्तृत होतातच, त्याशिवाय नवनिर्मितीची आणि शिकण्याची आजीवन उत्कटताही प्रज्वलित होते. या अनुभवासाठी आम्ही ब्रिलिओ, स्टेम लर्निंग आणि आमचे मार्गदर्शक यांचे मनापासून आभारी आहोत. येथे मिळालेली कौशल्ये आणि ज्ञानाच्या आधारे आम्ही जगाचा सामना करण्यास आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रात योगदान देण्यास तयार आहोत."


विजेते :

National Science Model Making Awards: 

1st: Pratik Narhari Jagdhane (Smt. S. D. GanagePrashala Triveni Nagar, Pune) and AshrivadaApppuni Patil, GMHPS Navage, Pune

2nd: Narayan Manjrekar (Malgaon English School, Mumbai) and Rudra Gurav (Kalsuli English School, Mumbai)


National Tinkering and Engineering Awards:

1st: Tanishq Sachin Chavan (NavonmeshVidyamandir, Chakan) and Ganesh Babu Kamathe (PunarutthanSamarsataGurukulam, Pune)

2nd: Amrutha (Rani Sarala Devi High School, Bangalore) and Chetan D (Rani Sarala Devi High School, Bangalore)


National Math & Tech Quiz Awards:

1st: KanishkTandel (Gurukul English Medium School, Walkhad, Mumbai) and Hardika Patil (S.E Rave, Mumbai)

2nd: Manohar Mukund (NavonmeshVidyamandir, Chakan, Pune) and Anup Mahadev Waghire


National STEM Master Maker 2023 Award:

1st: Narayan Manjrekar (Malgaon English School, Mumbai)

2nd: Tanishk Chavan (NavonmeshVidyamandir, Chakan, Pune)


या प्रसंगी खालील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला:

C Padmavathi, GHS Konnappa Agrahara, Bangalore (Karnataka)

Mr. Ananta Sarkar, Jyangra Adarsha Vidyalaya, Kolkata (West Bengal)

Md. Yasin Ansari, Netaji Hindi Vidyapeeth, Bongaingaon (Assam)

Mr. Rameet Singh, Om Foundation School, Delhi

Anikl Kumar Panika, Govenment Middle School, Kanai (Madhya Pradesh)


'नॅशनल स्टेम चॅलेंज'विषयी:

ब्रिलिओआणि स्टेम लर्निंग यांनी २०१९मध्ये आरंभकेलेल्या'नॅशनल स्टेम चॅलेंज'मध्ये वर्षभर विविध उपपक्रम चालत असतात. वर्षाच्या शेवटी एक राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येते. त्यामध्ये विद्यार्थी ऑन-द-स्पॉट स्वरुपाच्या आव्हानांना सामोरे जातात आणि मर्यादित कालावधीमध्ये समस्या सोडवण्याच्या आपल्या क्षमता प्रदर्शित करतात. स्पर्धेतउत्कृष्ट ठरलेल्या प्रकल्पांना विविध श्रेणींमध्ये बक्षिसे दिली जातात. 

मुलांमध्ये स्टेम क्षेत्रांबद्दल उत्कटता प्रज्वलित करणे, गतिमान शिक्षणाचे अनुभव मिळवून देणे, महत्त्वाची कौशल्ये त्यांच्या अंगी जोपासणे, 'स्टेम'मधील करिअरची ओळख करून देणे आणि या क्षेत्रांतील पुढील शिक्षणाला व नवकल्पनांना प्रेरणा देणे असे या चॅलेंजचे उद्दिष्ट आहे. ब्रिलिओ आणि स्टेम लर्निंग यांनी विज्ञान प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत आणि 'चॅलेंज'मध्ये सहभागी झालेल्या शाळांमध्ये प्रयोग आणि मॉडेल बनवण्यासाठीचेवैज्ञानिक संच पुरविले आहेत.

या उपक्रमाच्या काळात वर्षभरातअनेक परिसंवाद आयोजित केले जातात. त्यांमध्ये 'स्टेम राजदूत' स्टेम विषयांबद्दल आपली उत्कटता व्यक्त करतात, काही व्यावहारिक टिपा व कल्पना देतात आणि त्यांचे महत्त्व अधोरेखीत करतात. परिसंवादांच्या या सत्रांसाठी स्टेम-संबंधित विषयातील आणि करिअरच्या क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित केले जाते. या वर्षीच्या वक्त्यांमध्ये नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमेस) या संस्थेचे संचालक प्रा. अभिषेक मणी; यूकेमधील स्टेम राजदूत सिम्मी अँडरसन; श्नाइडर इलेक्ट्रिकच्या मुख्य माहिती अधिकारीआभा डोग्रा; आणि भाभा अणुसंशोधन केंद्रातीलवरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपमा कुलकर्णी यांचा समावेश होता.

याव्यतिरिक्त, टेक-संबंधित बातम्या, कथा व प्रश्नमंजुषांच्या माध्यमातूनशंभरपेक्षा जास्त ब्रिलिओस्वयंसेवक इतर सहभागींसोबत सामील होतात आणि विद्यार्थ्यांना 'स्टेममॉडेल्स' तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतात. येथील विद्यार्थ्यांनी ब्रिलिओ सायन्स डूइटयौरसेल्फकिटचा वापर करून लेझर सुरक्षा अलार्म, व्हॅक्यूम क्लीनर आणि हायड्रॉलिक ब्रिज यांसारखीवैज्ञानिक मॉडेल्सही बनविली आहेत.

या स्पर्धेमुळे शाळेतील उपस्थिती, सक्रिय वर्ग आणि सह-अभ्यासक्रम सहभाग, सुधारित शिक्षण परिणाम, डिजिटल साक्षरता आणि ग्रेड-विशिष्ट विषयांमध्ये वैचारिक स्पष्टता निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments