माॅडर्न काॅलेज गणेशखिंडच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश
पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच प्रकारच्या महाविद्यालयांना आपल्या दर्जासुधार मानांकनासाठी `नॅक`कडे विविध प्रकारची माहिती द्यावी लागते. अशा वेळी मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची जपणूक महाविद्यालयांना करावी लागते. कागदपत्रांची ही जपणूक महाविद्यालयांसाठी फार डोकेदुखीला सामोरे जावे लागते. परंतु आता गणेशखिंड येथील माॅडर्न कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक असे साॅफ्टवेअर तयार केले आहे, ज्यामुळे महाविद्यालयांचा हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
साॅफ्टवेअर बनवणाऱ्या या टीममध्ये संदिप बिराजदार, विशाल पवार, अभिजित साळवे, शंतनू पंडित, व्हिक्टर बीमर, आयुष खानापुरे यांचा समावेश असून, या विद्यार्थ्यांनी `मिरर` नावाचे सॉफ्टवेअर तयार करून ते शिक्षक दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात कॉलेजला सुपूर्द केले. प्रा रंजना शेवकर, प्रा ऋतुजा मोकाशी, प्रा ऐश्वर्या नाईक यांनी हे साॅफ्टवेअर तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले.
या साॅफ्टवेअरमध्ये NAAC च्या मार्गदर्शन प्रमाणे विभागवार, समितीनुसार, क्रायटेरियानुसार, कार्यालयानुसार विविध कागदपत्रे अपलोड केल्यास पुढील NNAC पर्यंत ती या साॅफ्टवेअरमध्ये स्टोअर होतील व त्यानुसार एसएसआरं भरणे सोपे होईल. कॉलेजची सर्व कागदपत्रे, फोटो, तसेच सर्व प्रकारची माहिती कुठल्याही त्रासाशिवाय नॅककडे व्यवस्थित सादर करता येतील. हे साॅफ्टवेअर पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी या वेळी केला.
साॅफ्टवेअर पूर्णपणे तयार झाल्यानिमित्ताने तसेच शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डॉ प्रकाश दीक्षित उपस्थित होते.
या वेळी बोलताना प्राचार्य डॉ. संजय खरात म्हणाले की, आमच्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या या सॉफ्टवेअरचा डेमो झालेला आहे. हे सॉफ्टवेअर NAAC च्या गाईडलाईन प्रमाणे बदलता येऊ शकेल. आज आमच्या विध्यार्थ्यांनी अतिशय मौल्यवान भेट दिलेली आहे. याचा वापर आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. हे सॉफ्टवेअर प्रत्येक ऑटोनोमस कॉलेज, मॅनेजमेन्ट इस्टिटयूट वापरू शकेल.याचे पटेन्ट रजिस्टरची प्रक्रिया सुरु आहे.
डेटा वेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन समिती प्रमुख प्रा विजया कुलकर्णी म्हणाल्या की, नॅकची प्रक्रिया आता सुरळीतपणे पार पडेल. सर्व डाॅक्युमेंट्स तयार असतील. या शिवाय आम्ही कॉलेजला ' मिरर डिजिटल आरकाईव्ह 'दिले आहे. यात कॉलजेच्या दोन नॅक सायकलचा (दहा वर्षाचा) डिजिटल पूर्ण डेटा आहे. जो पुढे कॉलेजला मार्गदर्शक ठरेलं.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ शुभांगी जोशी, डॉ ज्योती गगनग्रास, प्रो स्वाती कंधारकर व डॉ रवींद्र क्षीरसागर उपस्थित होते. प्रा रंजना शेवकर, प्रा ऋतुजा मोकाशी, प्रा ऐश्वर्या नाईक, डॉ पल्लवी निखारे यांनी साहाय्य केले.
मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड पुणे आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणे जिल्हा शाखा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्ताने इंडियन सोसायटीचा परिचय आणि प्रतिज्ञा या विषयावर एक उपक्रम पर पडला.
यावेळी विषय तज्ञ प्राचार्य तथा इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणेचे मानद सचिव आर. व्ही. कुलकर्णी म्हणाले की, रेड क्रॉस सोसायटीचे कार्य जागतिक पातळीवर सुरू आहे आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, पुनर्वसन इत्यादी कार्यात व शांततेच्या काळात विविध प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करते तसेच समाज उपयोगी आरोग्य, मैत्री आणि सेवा या त्रिसूत्रीला वापरून मानवतेच्या भावनेतून समाजातील गरजूंपर्यंत युवक पोहोचत आहे.
युथ रेड क्रॉस सोसायटीच्या समन्वयक अलका दळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्य यशस्वीतेसाठी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, प्रा. पराग शहा यांनी यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन डॉ. आबासो शिंदे कार्यक्रम समन्वयक व आभार प्रा. पुजा बहिरट यांनी व्यक्त केले.
0 Comments