`सोनालिका`ने ऑगस्टमध्ये एकूण १० हजार ६३४ ट्रॅक्टर विक्रीची केली नोंद


पुणे : शेतकऱ्यांसोबत विश्वास आणि भरभराटीचे भक्कम नाते उभारण्याचे तत्व कायमच जपले आहे. आपला हा वारसा आर्थिक वर्ष’२४ मध्ये असाच पुढे नेत सोनालिकाने ऑगस्ट’२३ मध्ये १०,६३४ ट्रॅक्टर्सची विक्री करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

ही खणखणीत कामगिरी सोनालिकाच्या प्रगत ट्रॅक्टर्सना भारतात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत मिळणाऱ्या वाढत्या स्वीकृतीचे द्योतक आहे. सणासुदीचा सर्वात मोठा मोसम जवळ आला असताना कंपनीने आपल्या उत्पादनात वाढ केली आहे आणि ऑगस्ट’२३ मध्ये १६,३०० ट्रॅक्टर्सची निर्मिती करून प्रतीमहिना उत्पादनाचा आजवरचा सर्वोच्च आकडा गाठला आहे. 

शेतकरी अत्यंत ताकदीने आपली कामगिरी पार पाडत असतात; मातीचा कस कसाही असला तरीही आपण पाहिलेले स्वप्न ते साकार करतातच. सोनालिकाच्या हेवी ड्युटी ट्रॅक्टर्सच्या २०-१२० एचपी क्षमतेच्या उत्पादन श्रेणीतील ट्रॅक्टर्सची रचना आगळ्यावेगळ्या आणि तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत वैशिष्ट्यांसह करण्यात आली आहे आणि शेतकऱ्याची सहजतेने भरभराट व्हावी याची काळजी त्यात घेतली गेली आहे.

जगभरातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा एक विश्वासू कुटुंबीय बनल्याचा आज कंपनीला अभिमान आहे. यातील २.३ लाख शेतकरी हे बाहेरच्या वेगवेगळ्या देशांतील आहेत. सध्या सोनालिकाने पोर्तुगाल, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, हंगेरी, झेक रिपब्लिक आणि अल्जेराया यांसारख्या देशांमध्ये आपले पहिले स्थान आणखी भक्कम केले आहे आणि भारतीय बाजारपेठेतही दुसरे स्थान गाठण्यासाठी कंपनीची वेगाने घोडदौड सुरू आहे.

आपल्या नव्या विक्रमी यशाविषयी बोलताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री. रामन मित्तल म्हणाले, शेतकऱ्यांची आपल्या देशाप्रती असलेली बांधिलकी, त्यांचा ध्यास आणि चिकाटी आम्हाला नवी कृषीतंत्रज्ञाने विकसित करण्यास आणि आमच्या हेवी ड्युटी ट्रक्टर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचा आनंददायी अनुभव देण्याची प्रेरणा देते.

ऑगस्ट’२३ मध्ये एकूण १०,६३४ ट्रॅक्टर्सच्या उत्पादनाचा नवा विक्रम करत आम्ही आगामी सणासुदीच्या मोसमासाठी आमचा मंच नव्याने सिद्ध केला आहे. यासंदर्भात आम्ही शेतकऱ्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात १६,३०० ट्रॅक्टर्सची निर्मिती करत ऑगस्टसाठीच्या उत्पादनाची सर्वोच्च संख्या नोंदवली आहे. 

आमची शक्तिशाली इंजिने आणि इंटेलिजन्ट ट्रान्समिशन्स इथपासून ते अचूक हायड्रॉलिक तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक गोष्ट आम्ही आपल्याच कंपनीअंतर्गत, होशियारपूर येथील आमच्या जगातील पहिल्या क्रमांकाच्या ट्रॅक्टर उत्पादन प्लान्टमध्ये केली आहे, ज्यामुळे आम्हाला या क्षेत्रात नवे प्रवाह आणणारी वैशिष्ट्ये विकसित करण्याचे बळ मिळते. 

प्रत्यक्ष कामगिरी करून दाखविणाऱ्यांना कुठेही थांबण्याची गरज नसते असे आम्हाला ठामपणे वाटते आणि आम्ही सणासुदीच्या मोसमातील मागणी पूर्ण करण्यासाठी, तसेच आपल्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या उत्पादनांच्या व सेवांच्या माध्यमातून भारतीय ट्रॅक्टर क्षेत्रासाठी नवे मापदंड निर्माण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.


Post a Comment

0 Comments