पुणे : आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर वी ने आपल्या पोस्टपेड युजर्सना अनोखा ग्राहक सेवा अनुभव प्रदान करण्यासाठी 'वी प्रायॉरिटी' ही नवी सेवा सुरु केली आहे. काही निवडक शहरांमध्ये करण्यात आलेल्या पायलट चाचणीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ही नवी सेवा डिझाईन करण्यात आली आहे.
मूल्य वृद्धिंगत व्हावे आणि ग्राहकांना मिळणाऱ्या समाधानामध्ये वाढ होण्यासाठी, अनोख्या वैशिष्ट्यांसह ग्राहक अनुभव व कामगिरीवर भर देण्यासाठी वी प्रायॉरिटी डिझाईन करण्यात आले आहे. ६९९ रुपये आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या रेंटल प्लॅन्सच्या तसेच ४ व त्यापेक्षा जास्त सदस्यांच्या फॅमिली प्लॅन्सच्या वी पोस्टपेड ग्राहकांना या प्रायॉरिटी सेवेचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिक तसेच १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळापासूनच्या वी ग्राहकांना देखील ही सेवा घेता येईल.
वी प्रायॉरिटी सदस्य म्हणून या वी युजर्सना अनेक विशेष लाभ मिळणार आहेत :
* २४X७ प्रीमियम कॉल सेंटर सेवेशी थेट संपर्क साधता येईल, आयव्हीआर मध्ये येणार नाही. त्यांचे कॉल्स थेट सिनियर कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह घेतील. अशाप्रकारे त्यांना अगदी सहजपणे ग्राहकसेवेचा अनुभव घेता येईल.
* अजिबात वाट पाहावी लागणार नाही: वी स्टोर्समध्ये देखील वी प्रायॉरिटी सेवा सदस्यांना त्यांचे प्रश्न, समस्या यांचे निवारण तातडीने करून मिळेल.
* प्रगत युजर इंटरफेस आणि वी ऍपवर अनुभव यामुळे बिलाचा भरणा अगदी सहजपणे करता येईल. याखेरीज वाढदिवस, लग्नाच्या वाढदिवसाला व्यक्तिगत शुभेच्छा आणि प्रीमियम ऑन-बोर्डिंग हे लाभ देखील मिळतील.
वी प्रायॉरिटीविषयी वोडाफोन आयडिया लिमिटेडचे सीओओ श्री. अभिजित किशोर यांनी सांगितले,"ब्रँड आणि नेटवर्क यांच्याशी प्रदीर्घ काळापासून कनेक्टेड असलेला खूप मोठा ग्राहकवर्ग वी कडे आहे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.
वी प्रायॉरिटी सेवा सादर करून आम्ही आमच्या पोस्टपेड सेवांचे अनोखेपण अजून जास्त वाढवले आहे. आमच्यासाठी आमचे ग्राहक अतिशय मौल्यवान आहेत आणि त्यांना आपण खास व सक्षम असल्याची भावना अनुभवता यावी हा आमचा प्रयत्न आहे. आमचे प्रायॉरिटी ग्राहक एक असा समुदाय आहे जो गेली अनेक वर्षे आमच्याशी जोडलेला आहे आणि आमच्या विशेष उत्पादनांचा व अतुलनीय सेवांचा लाभ घेत आहे.
एक कंपनी या नात्याने आम्ही सर्वोत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करण्यावर भर देतो, वी प्रायॉरिटी हे त्याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे ज्यामध्ये आमच्या सेवांचा स्तर कित्येक पटींनी वाढवला आहे."
वी प्रायॉरिटी सेवा मुंबई, दिल्ली, कोलकाता, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या नऊ सर्कल्समध्ये आधीच उपलब्ध करवून देण्यात आली असून लवकरच संपूर्ण भारतभर तिचा विस्तार करण्यात येईल.
वी ने देशामध्ये सर्वोत्तम मूल्य असलेले पोस्टपेड प्लॅन्स प्रस्तुत केले आहेत. या नव्या सेवेतून पोस्टपेड ग्राहकांना अधिक चांगला ग्राहक सेवा अनुभव प्रदान करून, मूल्य व ग्राहककेंद्री धोरण यामध्ये वाढ करण्याचा वी चा उद्देश आहे.
वी मॅक्स प्लॅन्समध्ये अधिक जास्त डेटा, अधिक नियंत्रण, अधिक सुविधा आणि अतुलनीय कन्टेन्ट ऑफरिंग्स मिळतात, त्यामुळे सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल ग्राहकांच्या बदलत्या, वाढत्या गरजा पूर्ण होतात. वी मॅक्स प्लॅन्सविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा: https://www.myvi.in/postpaid/vi-postpaid-plans
आपल्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून, मूल्य, काळजी आणि व्यक्तिगत सेवा यांचे अतुलनीय मिश्रण प्रस्तुत करण्यासाठी वी ने वी प्रायॉरिटीच्या रूपाने अजून एक पुढचे पाऊल उचलले आहे.
0 Comments