आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता विषयांवर मार्गदर्शन
पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी नुकतीच दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. आयआयसीच्या संयुक्त सहयोगाने पार पडलेल्या या कार्यशाळेचा विषय `इनोव्हेशन अँड टिंकरिंग जंक्शन : कनेक्टिंग स्टुडंट्स टू आयआयसी-एमआयटी एडीटी` असा होता.
एटीएल शाळांसोबत आयोजित या कार्यशाळेत एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना कौशल्य प्रधान केले तरच तंत्रज्ञान अवगत होईल या उद्देशातून आयोजित कार्यशाळेत या कार्यशाळेत ड्रोनचे प्रशिक्षण, नाविन्यता, संशोधन, उद्योजकता याबद्दल माहितीची आदान प्रदान करण्यात आली.
याशिवाय आयडिया एक्सपो तसेच विविध संशोधन शाळेमध्ये भेट देण्यात आली. आयडिया एक्स्पो या स्पर्धेत प्रणव भातगवे, अमोल कुंभार, राज काळभोर आणि ऋषिकेश साळुंखे यांनी प्राविण्य मिळवले.
या उपक्रम मध्ये साधना विद्यालय हडपसर आणि पृथ्वीराज कपूर हायस्कूल लोणी काळभोर या एटीएल शाळांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एटीएल शाळा व आयआयसी यांना एकत्रित आणण्यासाठी कार्यशाळेच्या संयोजिका व एटीएल को-आॅर्डिनेटर आयआयसी एमआयटी-एडीटीच्या प्रा. नेहा झोपे यांनी मोलाचे योगदान दिले. त्याचबरोरीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वीरेंद्र भोजवानी, स्टुडंट अफेयरविभागाचे प्रमुख डॉ. सुराज भोयर, डॉ. राकेश सिद्धेश्वर, प्रा. आशिष उंबरकर, प्रा. प्रतीक जोशी, प्रा. गणेश केकण, रोहन साठे व मुराद तांबोळी यांनी परिश्रम घेतले.
एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी संशोधनामुळे देशाच्या विकासाला आणि
अर्थव्यवस्थेला बळकटी येते म्हणून संशोधनाकडे वळा, असा संदेश विद्यार्थ्यांना यानिमित्ताने दिला.
0 Comments