आयएमए यांनी बीएएसएफ इंडिया आणि एनपीआयसी, एम्स-नवी दिल्ली यांच्या
सहयोगाने आयोजन
ह्या प्रशिक्षण हेतू हा मान्यता प्राप्त कार्यपध्दतीनुसार कृषी रसायनांच्या अपघाती विषबाधेच्या घटनांची हाताळणी व व्यवस्थापन याबाबत वैद्यकीय समाजाला निदान व उपचार यांच्या कार्यपध्दती व सहाय्य या विषयावर एक रिफ्रेशर देणे हा होता.
संलग्न क्षेत्रांसह शेती हे भारतातील उपजिविकेचा सर्वात मोठा मार्ग आहे.भारताच्या ग्रामीण कुटुंबांपैकी ७० टक्के हे अजूनही त्यांच्या उपजिविकेसाठी मुख्यत्वे शेतीवर अवलंबून असतात आणि भारतात १०० दशलक्ष पेक्षा जास्त शेतकरी असल्याने कृषी रसायनांच्या अपघाती विषबाधेच्या घटना घडत असतात.
अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांचे व्यवस्थापन व हाताळणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आणि स्थानिक रुग्णालयातील डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी हे आघाडीवरील लढवय्ये असतात. त्यामुळे कोणत्याही घटनेनंतर पहिल्या काही तासांमध्ये अचूक माहिती, व्यवस्थित रोगनिदान आणि नेमके उपचार हे अत्यंत महत्त्वाचे असतात.
मेडिको टॉक्सिकॉलॉजीते ह्यूमन हेल्थ रिस्क ॲसेसमेंट ॲण्ड फूड सेफ्टी वरील जागतिक तज्ञ डॉ. देवब्रत कानुंगो यांनी या प्रशिक्षणाचे आयोजन केले. नेमक्या केस स्टडीजद्वारे त्यांनी विषबाधेच्या विविध घटना हाताळण्याच्या आणि त्यांच्याशी संबंधित उपचारांच्या कार्यपध्दती समजावून सांगितल्या. ह्या प्रशिक्षणाद्वारे कृषी रसायनांच्या अपघाती विषबाधेच्या रोगनिदान व्यवस्थापन व उपचार यांच्या प्रमुख तत्त्वांची वर महत्त्वाची माहिती देण्यात आली.
निरंतर वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना आयएमएचे मानद सरचिटणीस डॉ. अनिल कुमार नायक म्हणाले की, शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया असते आणि वैद्यकशास्त्रातील नवीनतम प्रगतीविषयी अद्ययावत माहिती असणे हे वैद्यकीय व्यवसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते आणि आयएमएचा हा प्रशिक्षण कार्यक्रम कृषी रसायनांच्या अपघाती विषबाधेच्या घटनांमध्ये निदान व उपचार यासाठी डॉक्टरांना मदत करील.
आम्ही आयएमए या नात्याने आपल्या देशातील शेतकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या ह्या महत्त्वाच्या विषयावरील प्रशिक्षणासाठी प्रस्ताव व मदत दिल्याबद्दल बीएएसएफची प्रशंसा करतो. पीक सुरक्षा साधनांचे एक जबाबदार पुरवठादार त्या नात्याने यातून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत बीएएसएफची वचनबध्दता अधोरेखित होत आहे.
बीएएसएफच्या ॲग्रिकल्चरल सोल्यूशन्स, साऊथ एशियाचे व्यवसाय संचालक राजेंद्र वेलागला म्हणाले की, आयएमए, एनपीआयसी याच्यापाठिंबामुळे आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो कारण ते कोणत्याही दुर्दैवी घटनांमध्ये आमच्या शेतकर्यांची सेवा करतात. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत कारण आपला शेतकरी आपल्यासाठी परवडण्याजोगी उत्पादने पुरविण्याचे मोठे कार्य करीत असतात.
बीएएसएफ हे आपल्याकडून आपल्या सुरक्षा हमेशा उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना जबाबदार, सुरक्षित आणि नीतीपूर्ण व्यवस्थापनाच्या बाबींवर शिक्षित करण्याचा प्रयत्न करतात.
0 Comments