आचार्य अत्रे यांना पोवाडा आणि रंगावलीतून मानवंदना

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी चा पुढाकार ; अत्रे यांची १२५ वी जयंती


पुणे :  जन्मुनी मराठी मुलखात, झाले विख्यात, ठेवा लक्षात, प्र.के.अत्रे माहीर जगताला, संयुक्त महाराष्ट्र लढा लढला, शाहिराला विसर नाही पडला... अशा शब्दांत आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी स्वरचित पोवाडा विद्यार्थ्यांसमोर सादर केला. आचार्य अत्रे यांना शाहिरांनी पोवाडयातून आणि कलाकारांनी रंगावलीतून आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे, राष्ट्रीय कला अकादमी पुणे आणि न्यू एज्युकेशन सोसायटीची आगरकर प्रशाला यांच्या वतीने संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अग्रणी व आगरकर प्रशालेचे संस्थापक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने प्रशालेत आचार्य अत्रे यांच्या भव्य रांगोळीचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे डॉ. गिरीश धडपळे, विश्वास कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता लोणकर आदी उपस्थित होते. अरुण कुमार बाभूळगावकर, अक्षदा इनामदार, डॉ. मृणालिनी दुसाने, प्रतीक यादव, होनराज मावळे (हार्मोनियम), मुकुंद कोंडे (ढोलकी) यांनी साथसंगत केली. राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे यांनी रंगावली साकारली.

महाराष्ट्र गौरव प्र. के. अत्रे यांच्या प्रतिमा पूजनानंतर त्यांच्या जीवन गौरवपर आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी रचलेला पोवाडा सादर केला. यावेळी शाहिरांनी पोवाडयाद्वारे आचार्य अत्रे यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. पोवाडा लिहिलेली प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली.

Post a Comment

0 Comments