पुणे - नवोन्मेषी संकल्पना आणि उद्योजकतेला चालना देण्यावर भर देणारे एक महत्त्वाचे संमेलन `सितारा नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप समिट 2023` दि. 10 ऑगस्ट रोजी एमआयटी-एडीटी विद्यापीठात झाले. पेरा इंडिया, फास्ट इंडिया, डिजिटल इम्पॅक्ट स्केवयर, वाधवानी फाउंडेशन, ट्रूस्कॉलर, आणि इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल च्या सहकार्याने हे सम्मेलन पार पडले.
समिटची सुरुवात कार्यक्रमाचे संयोजक आणि अटल इनोव्हेशन मिशनचे मेंटॉर डॉ. सुराज भोयर यांच्या स्वागताने झाली. त्यांनी विद्यापीठाच्या कला, डिझाइन आणि तंत्रज्ञान शिक्षणाच्या अद्वितीय अभ्यासक्रमांवर प्रकाश टाकला. डॉ. भोयर यांनी विद्यापीठातील इनोव्हेशन इकोसिस्टम आणि विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेच्या चळवळीला चालना देण्यासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
सितारा इनोव्हेशन आणि स्टार्टअप समिटमध्ये फास्ट इंडिया द्वारे `भारतीय विद्यापीठांमध्ये संशोधन व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण फ्रेमवर्क` या विषयावरील सर्वसमावेशक अहवालाचे अनावरण देखील करण्यात आले. फास्ट इंडियाचे धोरण आणि संशोधन संचालक मुदित नारायण यांनी अहवालाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. मोहित दुबे यांनी नॅशनल रिसर्च फाउंडेशन बिल पास झाल्याची माहिती उपस्थितांना करून दिली आणि विकासात विज्ञानाच्या अविभाज्य भूमिकेचे महत्व विशद केले. दुबे यांनी खाजगी विद्यापीठांच्या नावीन्यपूर्ण प्रयत्नांची प्रशंसा केली आणि अभ्यासक्रमात कॉर्पोरेट सहयोग समाकलित करण्याचा एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रयत्नांची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून अटल इनोव्हेशन मिशनचे माजी आणि प्रथम संचालक रामनन यांनी शिखर परिषदेला संबोधित केले. भारताची लोकसंख्या सामर्थ्य आणि तरुण लोकसंख्येचे महत्त्व यावर उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी भारताच्या वाढत्या स्टार्टअप क्षेत्राबद्दल समाधान व्यक्त केले. रामनन यांनी या वेळी एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या प्रयत्नांची प्रशंसाही केली. सप्टेंबर २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात एमआयटी-एडीटी विद्यापीठात होणार्या आगामी `एमआयटी-अभिविकल्प` हॅकाथॉनचे त्यांनी उद्घाटन केले.
जागतिक कीर्तीचे शास्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात, अनिंदिता बॅनर्जी, जनक नाबर, डॉ. प्रेमनाथ आणि संदिप शिंदे यांच्यासह इतर तज्ञांनी भारतीय विद्यापीठांमध्ये संशोधन परिसंस्था मजबूत कशी करता येईल यावर पॅनल डिस्कशन ही आयोजित करण्यात आले होते. दरम्यान ट्रूस्कॉलर स्टार्टअपचे सीए मयूर झंवर यांनी ब्लॉकचेन-संचालित प्रमाणपत्र, वर्धित पडताळणी, डिजिलॉकरशी असलेले एकमेव इंटेग्रेशन आणि त्यांचे महत्व विशद केले.
समिटचा समारोप डायनॅमिक रिसर्च, इनोव्हेशन आणि स्टार्टअप प्रोजेक्ट्स यांच्या शोकेसनी झाला, जिथे 300 हून अधिक तरुण द्रष्ट्यांनी त्यांची कल्पकता, प्रकल्प, प्रोटोटाइप आणि स्टार्टअप्सचे प्रदर्शन केले. या सम्मेलनात सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्सने मोस्ट इम्पॅक्टफुल स्टार्टअप पुरस्कार; डिफेन्स फोर्जने सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण उत्पादन पुरस्कार; डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणीसाठी प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट संशोधन प्रकल्प पुरस्कार आणि इमर्जिंग इनोव्हेटर पुरस्कार प्राप्तकर्ता म्हणून 10 वी इयत्तेत शिकणाऱ्या कनिष्क देशमुखचे कौतुक करण्यात आले.
प्रा. धिमंत पांचाळ, डॉ. किशोर रवंदे, डॉ. ज्ञानदेव नीलवर्णा, डॉ. वीरेंद्र भोजवानी, प्रा. हर्षित देसाई, डॉ. अतुल पाटील, डॉ. रेणू व्यास, डॉ. नीरजा जैन, या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शिखर परिषद यशस्वीपणे पार पडली.
0 Comments