नादिर गोदरेज यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान


मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष नादिर गोदरेज यांना नुकताच महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे सन्माननीय 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे भारताच्या कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची पावती आहे.

हा पुरस्कार मिळाल्यावर नादिर गोदरेज म्हणाले, “गोदरेजमध्ये काम करताना आम्हाला आपल्या  देशाच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीत योगदान देता येते याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आमचे दीर्घकाळ चाललेले प्रयत्न भारत आणि येथील शेतकरी समुदायाप्रती असलेले अतूट समर्पण अधोरेखित करतात.

आपल्या देशाच्या हिताची सेवा करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याबद्दल आम्ही बांधील आहोत. हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केल्याबद्दल मी आपला शेतकरी समुदाय, आमची समर्पित गोदरेज टीम आणि महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.”

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने आयोजित केलेला हा कार्यक्रम निव्वळ एका सोहळा असण्याच्या पलीकडे होता. कृषी क्षेत्रातील अग्रणी आणि दूरदृष्टीने विचार करणारे शेतकरी या निमित्ताने एकत्र आले. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देत त्यांनी काढलेले उत्पादन आणि त्यासाठी केलेले उपाय याविषयी विचारमंथन होण्याचा उद्देश होता. या प्रसंगी महाराष्ट्राच्या सर्व भागातील सन्माननीय व्यक्ती आणि शेतकरी एकत्र आले.

एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल; एफएमसी इंडिया लिमिटेडचे कॉर्पोरेट व्यवहार संचालक राजू कपूर आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments