समृद्धी गोसावी, अपूर्वा लाहोटी आर्किटेक्चरल कोशंट स्पर्धेत प्रथम

पीव्हीपी महाविद्यालयातर्फे आर्किटेक्चरल कोशंट आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा


पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित  'आर्किटेक्चरल कोशंट'  आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत पीव्हीपी महाविद्यालयाच्या समृद्धी गोसावी, अपूर्वा लाहोटी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 

  स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी वरिष्ठ संरचना अभियंता जयंत इनामदार, वरिष्ठ वास्तुविशारद कीर्ती शाह, व्हीआयटीचे अध्यक्ष अभय छाजेड, सचिव जितेंद्र पितळीया, महाविद्यालयाचे संचालक प्राचार्य प्रसन्न देसाई, स्पर्धा समन्वयक शेखर गरुड यावेळी उपस्थित होते. नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात स्पर्धा आणि स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले.

बीकेपीएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे ईशा चिपळूणकर आणि पियुष अग्रवाल प्रथम उपविजेते तर एमएम कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे आफताब हवालदार, पियुष भाजेकर द्वितीय उपविजेते ठरले.  भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांना सर्वाधिक स्पर्धक सहभागी झाल्याबद्दल विशेष पारितोषिक देण्यात आले.

विजेत्या संघाला प्रमाणपत्रे आणि १२ हजार रुपये, प्रथम उपविजेत्या संघासाठी ८ हजार रुपये आणि द्वितीय उपविजेत्या संघांना ६ हजार  रुपयांची पारितोषिके देण्यात आले. शेवटच्या तीन संघांसाठी २ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात आले.

Post a Comment

0 Comments