`जीविका हेल्‍थकेअर`ने सुरू केली जीविका संपूर्ण लसीकरण योजना

चित्रपट 'माहेरची साडी'मधील प्रख्‍यात अभिनेत्री अलका कुबल यांचा उपक्रमाला पाठिंबा  


पुणे : लहान मुलांना विविध प्रकारच्या गंभीर आजारांपासून संरक्षण देणाऱ्या अनोख्या लसीकरण कार्यक्रमाची घोषणा जीविका हेल्थकेयरने आज एका समारंभात केली. या समारंभाला जीविका हेल्थकेअरचे संस्थापक व सीईओ जिग्नेश पटेल यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची विशेष उपस्थिती होती.

जीविका हेल्‍थकेअर तळागाळाच्‍या स्‍तरावर परवडणारी, उपलब्‍ध होण्‍याजोगी व समान आरोग्‍यसेवा सिस्‍टम्‍स निर्माण करण्‍याप्रती समर्पित सामाजिक उद्योग आहे. मंगळवार 22 आॅगस्ट रोजी झालेल्या विशेष समारंभाला जीविका हेल्थकेअरच्या सल्लागार मंडळाचे सदस्य. डॉ. राज शंकर घोष, जीविका हेल्थकेअरचे  सह-संस्थापक आणि सीओओ कृणाल मेहता आणि वॅक्सिन आॅन व्हिल्सचे वरिष्ठ व्यवस्थापक अंकित सिंग उपस्थित होते.

हा उपक्रम सरकारी लसीकरण उपक्रमांतर्गत नसलेल्‍या लसींना अत्‍यंत किफायतशीर दरामध्‍ये उपलब्‍ध करून देत मुलांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण होण्‍याची खात्री घेतो. हा अग्रगण्‍य प्रकल्‍प टायफॉइड, हिपॅटायटीस-ए, इन्फ्लूएन्झा, मेनिन्गोकोकल आणि चिकन पॉक्स या पाच लस-प्रतिबंधक आजारांविरुद्ध ९ वर्षांपर्यंतच्या मुलांना महत्त्वाच्या लस देण्यावर लक्ष केंद्रित करेल.

`जीविका संपूर्ण टीकाकरण योजना` (जेएसटीवाय)चे सादरीकरण सामुदायिक पातळीवर या आजारांविरोधात लढण्‍यसाठी घेतलेला पुढाकार आहे. ही योजना मुलांचे जीवन व भविष्‍याचे संरक्षण करण्‍यास मदत करते, परिणामत: त्‍यांच्‍या शारीरिक व मानसिक विकासामध्‍ये अडथळे निर्माण करणारे गंभीर धोके कमी होणार आहेत.

या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून जीविका हेल्‍थकेअर सरकारच्‍या लसीकरण मोहिमेला पाठिंबा देण्‍याप्रती समर्पित असलेली अद्वितीय खाजगी हेल्‍थकेअर सेवा प्रदाता आहे. या उपक्रमाद्वारे पालक प्रथम मोफत सरकारी लसीकरणांना प्राधान्‍य देत असल्‍याची आणि त्‍यानंतर त्‍यांच्‍या मुलांची जेएसटीवायसाठी नोंदणी करत सरकारी केंद्रांमध्‍ये उपलब्‍ध नसलेल्‍या या अतिरिक्‍त लसींचा फायदा घेत असल्‍याची खात्री घेण्‍यात येईल.

या उपक्रमाचा एकूण लसीकरणाचे प्रमाण वाढवण्‍याचा, तसेच व्‍याजमुक्‍त मासिक हप्‍त्‍यांच्‍या माध्‍यमातून अत्‍यावश्‍यक आर्थिक साह्य प्रदान करण्‍याचा उद्देश आहे. हा उपक्रम महाराष्‍ट्रातील पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपासून सुरू होईल, जो व्‍यापक लसीकरण उपलब्‍धतेमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या दिशेने जीविका हेल्‍थकेअरचा पहिला पुढाकार असेल.

महाराष्‍ट्रातील सर्वात मोठी खाजगी लसीकरण साखळी जीविका हेल्‍थकेअरने पुण्‍यामध्‍ये १०० लसीकरण क्लिनिक्‍स लॉन्‍च केले आहेत, ज्‍यामुळे कुटुंबांना व समुदायांना सुलभपणे लसीकरण उपलब्‍ध झाले आहे. विचारशील विस्‍तारीकरण योजनेला पुढे घेऊन जात हा उपक्रम राज्‍यातील इतर प्रदेशांमध्‍ये, तसेच देशभरात विस्‍तारित होण्‍यास सज्‍ज आहे.

जीविका संपूर्ण टीकाकरण योजनेच्या मिशनवर अधिक भर देत मराठी चित्रपटसृष्‍टीतील दिग्‍गज अभिनेत्री श्रीमती अलका कुबल यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यासाठी मोहिमेचा चेहरा व आवाज म्‍हणून सहयोग करीत आहेत. 

अभिनेत्री अलका  कुबल म्‍हणाल्‍या, मला जीविका संपूर्ण लसीकरण योजनेचा भाग असल्याबद्दल अभिमान वाटत आहे. जीवनदायी लसीकरण हे प्रत्‍येक मुलाचा अधिकार आहे आणि त्‍यांना प्रतिबंधात्‍मक आजारांविरोधात लसीकरणाच्‍या माध्‍यमातून योग्‍य संरक्षण मिळण्‍याची खात्री घेणे ही आपल्‍या सर्वांची जबाबदारी आहे. मी देशाच्‍या कानाकोपऱ्यामध्‍ये या संदेशाचा प्रसार करण्‍यासाठी माझा पाठिंबा व योगदान देण्‍याचा निर्धार केला आहे.

जीविका हेल्‍थकेअरचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जिग्‍नेश पटेल म्‍हणाले की, जीविका संपूर्ण टीकाकरण योजना ही समाजातील सर्वाधिक दुर्लक्षित मुलांच्‍या आरोग्‍याला उत्तम करण्‍याप्रति सरकारच्‍या प्रयत्‍नांना पाठिंबा देण्याबाबत आमची कटिबद्धता निश्चित करतो आहे. भारत सरकारचा युनिव्‍हर्सल इम्‍यूनायझेशन प्रोग्राम (यूआयपी) सर्व नागरिकांना आवश्‍यक लस देण्‍यामध्‍ये हा उपक्रम साह्यभूत ठरत आहे.

जीविका हेल्‍थकेअरच्‍या जेएसटीवाय उपक्रमाने वंचित समुदायांना अतिरिक्‍त लसीकरण सुविधा देण्‍यासाठी स्‍थानिक प्रॅक्टिशनर्ससोबत सहयोग केला आहे. हा उपक्रम मुलांसाठी आजारांना प्रतिबंध करणाऱ्या वातावरणाची निर्मिती करतो आणि सध्‍या पुण्‍यातील पीसीएमसी क्षेत्रात कार्यरत आहे. सुलभ उपलब्‍धतेसाठी जनतेकरिता हॉटलाइन क्रमांक ९५०३० ४७८६० उपलब्‍ध आहे. 

Post a Comment

0 Comments