लॉर्ड्स ऑटोमॅटिव्हने ८ अत्याधुनिक दुचाकी आणि तीनचाकी इलेक्ट्रिक वाहने केली लाँच


पुणे : लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजची उपकंपनी - लॉर्ड्स ऑटोमेटिव्ह प्रा. लि.ने देशातील भरभराट होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहने अर्थात ईव्ही बाजारपेठेतील अग्रणी म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी आठ इलेक्ट्रिक वाहनांची विशेष श्रेणी लाँच केली आहे.

लॉर्ड्स ऑटोमॅटिव्हने सहा तीनचाकी ईव्ही मॉडेल आणली आहेत. ज्यामध्ये, लॉर्ड्स किंग ई-रिक्षा, लॉर्ड्स सम्राट ई-लोडर, लॉर्ड्स सवारी बटरफ्लाय ई-रिक्षा, लॉर्ड्स गती बटरफ्लाय ई-लोडर आणि अक्षम/विकलांग व्यक्तींसाठी खास रचना करण्यात आलेली लॉर्ड्स ग्रेस ई-रिक्षा यांचा समावेश आहे.

या शिवाय कचरा वाहतुकीसाठी लॉर्ड्स स्वच्छ यान ई-गार्बेज तसेच दोन हाय-स्पीड टू-व्हीलर अर्थात ईव्ही स्कूटरची मॉडेल्स - लॉर्ड्स इग्नाइट हाय स्पीड ई-स्कूटर आणि लॉर्ड्स प्राइम हाय स्पीड ई-कार्गो स्कूटरचे अनावरण करण्यात आले आहे. देशभरातील डीलर्स, वितरकांकडे ४९,९९९ - १,७५,००० रुपयांच्या श्रेणीत किंमत असलेली या ई-व्ही अंतिम वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत.

अनावरणावर भाष्य करताना, लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. सच्चिदानंद उपाध्याय म्हणाले, “आठ अत्याधुनिक ईव्हींचे अनावरण हा आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. देशभरात इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती आणणे हे आमचे ध्येय आहे.

आमचा विश्वास आहे की प्रवासी आणि वस्तूंच्या वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर ईव्हीचा अवलंब पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करणारा ठरेल. आमच्या ईव्ही सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत गतिशीलता प्रदान करण्यासाठी सुसज्ज आहेत.  ग्राहकांच्या मागणीत वाढ आणि ईव्ही तंत्रज्ञानातील प्रगती यांवर सरकारनेही लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक ईव्ही बाजारपेठेत सध्या वेगाने वाढ होत असल्याने आम्ही आमची ईव्ही उत्पादन क्षमता आणखी वाढविण्यासाठी गुंतवणूक करणे सुरू ठेवू.”

लॉर्ड्स ऑटोमेटिव्हने बजाज फिनसर्व्ह, पाइन लॅब्स, इझीटॅप, असेंड, अकासा फायनान्स, लोनटॅप, पेटेल, कोटक महिंद्र, पेटीएम, गोपिक आणि पिक्समो फायनान्स यांच्याशी किमान व्याजदर आणि प्रक्रिया शुल्कासह खरेदीदार ग्राहकांना सुलभ वित्त पर्याय प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. 

दुचाकी ईव्ही हे इग्निशन लॉक, मोटर, कंट्रोलर आणि डिस्प्ले मीटर यांसारख्या घटकांवर एक वर्षाच्या मानक वॉरंटीसह येतात आणि वाहनासोबत येणाऱ्या कन्व्हर्टरवर सहा महिन्यांची वॉरंटीही ग्राहकांना दिली जाते. तर, सर्व तीनचाकी ईव्हींमध्ये मोटर, कंट्रोलर, डिफरेंशियलवर एक वर्षाची मानक वॉरंटी आहे जी प्रत्येक वाहनासोबत येते. सर्व ईव्हींच्या बॅटरी आणि चार्जरवर मूळ पुरवठांद्वारे लीड अॅसिडवर एक वर्ष आणि लिथियमवर तीन वर्षांची वॉरंटी दिली जाते. या बॅटरी एआयएस १५६ मानदंडांसह सौंदर्याचा नवीनतम नमुन्यासह, सर्व सुरक्षा मापदंडांचे पालन सुनिश्चित करतात.

या ईव्हीचे सुटे भाग कंपनीच्या डीलरशिप आणि वितरक नेटवर्कद्वारे उपलब्ध आहेत. कंपनी ग्राहक समर्थन, अहोरात्र (२४ तास, ७ दिवस), सुटे भाग बदलणे, वाहन वितरण, डीआयवाय व्हिडिओ देखील प्रदान केले जातात, जेणेकरून सर्व प्रकारचे हवामान वाहन सहन करू शकेल आणि वाहनमालक बॅटरीची काळजी घेऊ शकतील.

आपले नेतृत्व जाळे आणखी विस्तारण्यासाठी, लॉर्ड्स ऑटोमॅटिव्हने ५ ते २० लाख गुंतवणूक क्षमता असलेल्या नव-उद्योजकांना वितरक म्हणून काम करण्याची संधी देऊ केली आहे. कंपनी तिच्या डीलर्सना सर्व आवश्यक प्रशिक्षण आणि समर्थन देईल.

Post a Comment

0 Comments